Sharad Pawar News : भेट पवार-शाहू महाराजांची, टेन्शन वाढले इच्छुकांचे !

candidate discussed Tonight : उमेदवारीबाबत आज रात्री चर्चा होण्याची शक्यता
Sharad Pawar-Shahu Maharaj
Sharad Pawar-Shahu MaharajSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण अशी चर्चा रंगत असताना शाहू महाराज यांचे नाव यासाठी आघाडीवर येत आहे. त्यातच लोकसभेला त्यांच्या नावाचा आग्रह ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेतल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, आज रात्री आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी उमेदवारीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेतली असावी. उमेदवारीबाबत स्पष्टीकरण आणण्यासाठी ही भेट महत्त्वाची असू शकते, असाही अंदाज लावला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar-Shahu Maharaj
'Maratha Reservation' मराठा आरक्षण विधेयकावर संभाजीराजेंनी दिला 'हा' सल्ला; म्हणाले...

पवार हे हेलिकॉफ्टरने पुण्याहून निघाले. कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी थेट नवीन राजवाडा येथे जाऊन श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेतली. तिथे शाहू महाराज यांच्याशी चर्चा आणि चहापान झाल्यानंतर ते पंचशील हॉटेलवर गेले. त्यानंतर ते ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या स्मृती स्मारकाच्या अनावरण समारंभास उपस्थित राहणार आहेत.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार संभाजीराजे यांनी स्वराज्य पक्षाकडून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे, तर शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीकडून त्यांनी लढावे अशीही चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी शाहू महाराज यांची भेट घेतली की काय? अशा चर्चांना आता उधाण आले आहे.

Sharad Pawar-Shahu Maharaj
Maratha Reservation : एकाच जातीला 10 टक्के आरक्षण का? छगन भुजबळांचा सरकारला सवाल

दरम्यान, शरद पवार हे आज रात्री काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन घेणार आहेत. तिथे उमेदवारीसंदर्भात काही निर्णायक चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यातील काही स्पष्टता होण्यासाठीच पवार यांनी श्रीमंत शाहू महाराज यांच्याशी अगोदर चर्चा केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीने या चहापान आणि स्नेहभोजन भेटीला महत्त्व आले आहे. शिवाय त्यांच्या भेटीने अनेक चर्चेला ऊत आला आहे.

Edited By : Chaitanya Machale

R

Sharad Pawar-Shahu Maharaj
Parth Pawar : शिरूरमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांचा 'पंच'; पार्थ पवारांच्या 'खासदारकी'साठी ठरणार 'लकी'!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com