Pawar on Siddheshwar Chimney: शरद पवारांचे सिद्धेश्वर कारखाना चिमणीसंदर्भात प्रथमच भाष्य; ‘आम्ही लोकांनी त्यात लक्ष घातले आहे...’

Sharad Pawar Statement on Siddheshwar Chimney: आर्यन ग्रुपच्या वतीने धर्मराज काडादी प्रमुख असलेल्या सिद्धेश्वर देवस्थानसाठी दीड कोटी रुपयांची देणगी शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आली.
Dharmraj Kadadi -Sharad Pawar
Dharmraj Kadadi -Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : सोलापुरात काडादी यांनी एक सहकारी साखर कारखाना काढला. पण त्यालाही आता काही अडचणी आहेत. त्यात अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. धर्मराज काडादी आणि त्यांचे सहकारी त्यादृष्टीने चिकाटीने लढत आहेत. तो कारखाना नीट कसा चालेल आणि चिमणीचा प्रश्न कसा सोडविता येईल, यात आम्ही लोकांनी लक्ष घातले आहे, अशा शब्दांत चिमणीच्या प्रश्नावर आपण काडादी यांच्यासोबत असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले. (Sharad Pawar's comment regarding Chimney of Siddheshwar Sugar Factory)

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते सोलापुरातील पहिल्या आयटी पार्कचे भूमिपूजन आज (ता. १३ ऑगस्ट) करण्यात आले. त्या कार्यक्रमात पवारांनी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीबाबतच विषय छेडला. कार्यक्रमाला उद्योजक अतुल चोरडिया, सतीश मगर, आर्यन ग्रुपचे मुकुंद जगताप, आर्यन ग्रुपच्या कार्यकारी संचालक स्मिता जगताप आदी उपस्थित होते.

Dharmraj Kadadi -Sharad Pawar
Solapur First It Park : तुम्ही आता सोलापुरात आलात, येथून परत जायचं नाही; शरद पवारांची उद्योजकांना सूचना

दरम्यान, याच कार्यक्रमात आर्यन ग्रुपच्या वतीने धर्मराज काडादी प्रमुख असलेल्या सिद्धेश्वर देवस्थानसाठी दीड कोटी रुपयांची देणगी शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आली.

पवार म्हणाले की, सोलापूरचे नाव वस्त्रोद्योगात एकेकाळी मोठे होते. मी सोलापूरचा पालकमंत्री होतो, त्यावेळी लक्ष्मी विष्णू, जाम मिल, नरसिंग गिरजी आदी मोठ्या मिल्स हे सोलापूरचं वैशिष्ट्य होतं. पण आज दुर्दैवाने एकही मिल चालू नाही. कापडी मिल्सबरोबरच किर्लोस्कर यांचं एक युनीटही सोलापुरात होतं. अलीकडं सोलापुरातील औद्योगिक प्रकल्प कमी झाले आहेत. नाही म्हणायला काडादी यांनी एक सहकारी साखर कारखाना काढला. पण, त्यालाही काही अडचणी आहेत. त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. तो कारखाना नीट कसा चालेल आणि चिमणीचा प्रश्न कसा सोडविता येईल, यात आम्ही लोकांनी लक्ष घातले आहे.

Dharmraj Kadadi -Sharad Pawar
Solapur Politics : राष्ट्रवादी प्रवेशावेळी शरद पवारांनी मला हा शब्द दिला होता;महेश कोठेंनी उघड केले गुपित

सोलापूरच्या विमानसेवेला असणाऱ्या अनेक अडथळ्यांपैकी एक असलेल्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी १५ जून रोजी पाडण्यात आली आहे. तेव्हापासून कारखान्याच्या चिमणीची विषय विविध पातळ्यांवर चर्चिला जात आहे. चिमणी पाडल्यानंतर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार मधुकरराव चव्हाण हे काडादी यांना भेटून गेले आहेत. चिमणी पाडण्याबाबत काडादींचा भाजप नेत्यांवर आरोप आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com