शशिकांत गाडे म्हणाले, नगर तालुका बाजार समितीचा भ्रष्टाचार जनतेसमोर आणा

शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे ( Shashikant Gade ) यांनी शिवसैनिकांना आदेश दिला.
Shashikant Gade
Shashikant GadeSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक जवळ आल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप वाढत आहेत. शिवसेना पदाधिकाऱ्याची आज बाजार समिती निवडणूक, सेवा सोसायटीच्या निवडणुका आणि जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणूक या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे ( Shashikant Gade ) यांनी शिवसैनिकांना आदेश दिला. ( Shashikant Gade said, bring the corruption of Nagar Taluka Bazar Samiti before the people )

या बैठकीला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, युवा नेते प्रवीण कोकाटे, संदीप गुंड, पंचायत समिती सदस्य व्ही. डी काळे, रामदास भोर, गुलाब शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत, विश्वास जाधव, प्रकाश कुलट यांसह तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी हजर होते.

Shashikant Gade
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महामार्ग कामगारांना डांबले

प्रा. शशिकांत गाडे म्हणाले, बाजार समितीच्या निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सोसायटीची मते महत्वाची आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आपल्याच ताब्यात येणार आहे. नगर तालुक्यातील बाजार समिती मधील भ्रष्टाचार गावोगावी जाऊन जनतेसमोर मांडा त्यांच्या भ्रष्टाचाराची पत्रक गावोगावी वाटण्याचे आदेश प्रा. गाडे यांनी दिले.

गाडे पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सर्व संस्थांची वाट लागली आहे. तालुका सहकारी साखर कारखाना, दूध संघ शेतकऱ्यांचा राहिला नाही. बाजार समितीची जागा विकून मोठमोठे शॉप तयार झालेले दिसतात. जागा विक्रीत कसा भ्रष्टाचार झाला आहे. एकमेव राहिलेल्या बाजार समितीमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेला आहे.

Shashikant Gade
सहकार विभागाची नगर तालुका बाजार समितीला ‘कारणे दाखवा’ नोटीस

बाजार समिती शेतकऱ्यांची बाजार समिती जिवंत ठेवायची असेल तर सत्ता परिवर्तन झाले पाहिजे. पणनने बाजार समितीला नोटीस दिली होती, ते मुद्दे घेऊन तालुक्यातील गावोगावी जनतेसमोर जा. ज्या गावात सेवा सोसायटीच्या निवडणूक सुरू आहेत त्या गावात प्रथम जा. दमदाटी करून सेवा सोसायटी ताब्यात असल्याचा देखावा केला जात आहे. ते लोकांसमोर मांडा. त्याचप्रमाणे गावोगावी युवा सेनेच्या शाखा स्थापन करा असे आदेश प्रा.गाडे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com