Koragaon Political News : नरडीवर पाय देत पक्षवाढीचा महेश शिंदेंचा नवीन धंदा...शशिकांत शिंदेंची घणाघाती टीका

Shashikant Shinde ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत कोरेगाव मतदारसंघातील घडामोडींवर भाष्य केले.
Shashikant Shinde, Mahesh Shinde
Shashikant Shinde, Mahesh Shindesarkarnama
Published on
Updated on

Koregaon Political News : कोरेगावचे आमदार सध्या मी सांगेन तसेच झाले पाहिजे, असे म्हणून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आणाण्याची भीती दाखवत आहेत. लोकांचे रस्ते बंद करायचे, वहिवाट बंद करायची, अशा प्रकारे नरडीवर पाय देऊन लोकांना म्हणायचे 'आमच्याकडे या', हा पक्षवाढीचा नवीन धंदा त्यांनी सुरू केला आहे, अशी परखड टीका आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांच्यावर केला आहे.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोरेगाव मतदारसंघातील Koregaon Politics घडामोडींवर भाष्य केले. लोकशाही मार्गाने निवडणूक जिंकता येत नाही, म्हणून सरपंचपदाच्या उमेदवाराला इन्कम टॅक्सचा धाक दाखवून त्याच्या व्यवसायावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत धाड टाकून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, ही कसली लोकशाही? असा प्रश्नही आमदार शिंदे यांनी उपस्थित केला.

आमदार शिंदे म्हणाले, "सध्या केंद्रामध्ये, राज्यामध्ये ज्या प्रकारे शासकीय यंत्रणांचा धाक दाखवला जात आहे, तशीच प्रवृत्ती कोरेगाव मतदारसंघातील कोरेगाव, सातारा, खटाव भागामध्ये सध्या कार्यरत आहे. पोलिस प्रशासनासह प्रांताधिकारी, तहसीलदार, पंचायत समितीच्या कार्यालयांतील अगदी शिपायांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना अर्वाच्य भाषा वापरून दबाव टाकण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. Maharashatra Political News

लोक संधीची वाट पाहत आहेत. त्यांना संधी मिळताच या हुकूमशाहीचा अंत होईल. लोकांना विनाकारण त्रास देणाऱ्यांची सगळी जंत्री मी बाहेर काढतोय, प्रशासनाने भूमिका बदलली नाही, तर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मला आंदोलनाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

Edited By : Umesh Bambare

Shashikant Shinde, Mahesh Shinde
Satara Political News : शिवेंद्रसिंहराजे भडकले; सातारा- जावलीतील दुष्काळाकडे दुर्लक्ष नको

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com