Shetkari Kamgar Paksh : 'शेकाप'चे 19वे अधिवेशन पंढरपुरात होणार; शरद पवार असणार प्रमुख पाहुणे!

Shetkari Kamgar Paksh Pandharpur Session : जाणून घ्या, अधिवेशनाची तारीख आणि कार्यक्रमांची सविस्तर माहिती; उद्घाटन मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आॕफ इंडिया पक्षाचे सरचिटणीस काॅम्रेड दीपाशंकर भट्टाचार्य यांच्या हस्ते होणार आहे.
Shetkari Kamgar Paksh
Shetkari Kamgar PakshSarkarnama
Published on
Updated on

SKP Politics News : नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या काँग्रेसची मतं फुटल्यामुळे जयंत पाटलांसारख्या ज्येष्ठ नेत्याला पराभवास सामोरे जावे लागल्याचे समोर आले आहे. त्यांच्या पराभवामुळे शेकापचा विधिमंडळातील आवाज गायब झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान या निवडणुकीनंतर आता भारतीय शेतकरी कामगार‌ पक्षाचे अधिवेशन होत आहे.

02 व 03 ऑगस्ट रोजी पंढरपुर येथे भारतीय शेतकरी कामगार‌ पक्षाचे एकोणीसावे अधिवेशन संपन्न होणार आहे. आणि या अधिवेशनास ज्येष्ठ नेते शरद पवार(Sharad Pawar) यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहे. तर, उद्धाटन मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आॕफ इंडिया पक्षाचे सरचिटणीस कॉम्रेड दीपाशंकर भट्टाचार्य यांच्या हस्ते होणार आहे. तसेच, यावेळी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत आणि अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी संपतराव पवार-पाटील असणार आहेत. अशी माहिती अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिली आहे.

Shetkari Kamgar Paksh
Pandharpur PWP Convention : पंढरपुरातील अधिवेशनातून शेकाप फुंकणार विधानसभेसाठी रणशिंग...

अधिवेशनाचा पहिला दिवस -

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शुक्रवार (ता. 2) रोजी खुले सत्र होणार असुन दुपारी दोन वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांती ज्योती मशालीचे प्रज्वलन करण्यात येणार आहे. अधिवेशनाचे अध्यक्ष संपत पवार-पाटील यांच्या शुभहस्ते लाल ध्वजाला सलामी देण्यात येईल. स्वागताध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख आपले विचार व्यक्त करणार आहेत.

तसेच दुपारी तीन वाजता पक्षाचे सरचिटणिस जयंत पाटील(Jayant Patil) हे प्रस्ताविका व पाहुण्यांची ओळख करुन देतील. दीपाशंकर भट्टाचार्य उद्घाटनाचे विचार व्यक्त करतील. तसेच दुपारी सव्वाचार वाजता शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी उदय नारकर, अॕड. सुभाष लांडे, भिमराव बनसोड, किशोर ढमाले, साथी प्रताप होगाडे आपले विचार व्यक्त करतील. सायंकाळी साडेपाच वाजता शेतकरी कामगार पक्षाचे प्रा. एस. व्ही. जाधव हे राजकीय ठराव मा़डणार आहेत.

अधिवेशनाचा दुसरा दिवस -

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार (ता. ३) रोजी सकाळी नऊ वाजता थोर विचारवंत माननिय कराळे यांचे संविधान या विषयावरती व्याख्यान होणार आहे. तसेच सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत राजकीय ठरावावरती चर्चा होईल. दुपारी अध्यक्षीय म़ंडळाच्या सहमतिने पक्षाचे पदाधिकारी, सरचिटणीस व चिटणिस मंडळ, मध्यवर्ती समिती अशा विविध पदाधिकाऱ्यांच्या महत्वपूर्ण निवडी करण्यात येणार आहेत. शेवटी पक्षाचे नवनिर्वाचीत सरचिटणिस अधिवेशनाच्या समारोपाचे भाषण करतील व अधिवेशनाची‌ सांगता होईल.

Shetkari Kamgar Paksh
Mahendra Dalvi VS Jayant Patil : जयंत पाटलांना शिंदे गटाचा खोचक सल्ला; ‘शेकाप आता कुठल्या तरी राष्ट्रीय पक्षात विलिन करावा’

या अधिवेशनात पक्षाचे व पुरोगामी युवक संघटनेचे राज्यभरातुन जे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते येणार आहेत त्यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी या अधिवेशनास सर्वांनी उपस्थीत राहावे असे अवाहन अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com