Pandharpur PWP Convention : पंढरपुरातील अधिवेशनातून शेकाप फुंकणार विधानसभेसाठी रणशिंग...

Assembly Election 2024 : पंढरपुरात येत्या एक ते तीन ऑगस्ट रोजी शेतकरी कामगार पक्षाचे त्रैवार्षिक अधिवेशन होणार आहे. शेकापचे या अगोदर पंढरपुरात 1966 मध्ये अधिवेशन झाले होते, त्यानंतर आता दुसऱ्यांना पंढरपूरला अधिवेशनाचा मान मिळालेला आहे.
PWP & Jayant Patil
PWP & Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 21 July : शेतकरी कामगार पक्षाचे पंढरपूर येथे एक ते तीन ऑगस्टदरम्यान त्रैवार्षिक अधिवेशन होत आहे. पंढरपुरात शेकापचे तब्बल 58 वर्षांनंतर अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून शेकाप आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे, त्यामुळे या अधिवेशनाकडे सोलापूरसह महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.

पंढरपुरात (Pandharpur) येत्या एक ते तीन ऑगस्ट रोजी शेतकरी कामगार पक्षाचे त्रैवार्षिक अधिवेशन होणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे (PWP) या अगोदर पंढरपुरात 1966 मध्ये अधिवेशन झाले होते, त्यानंतर आता दुसऱ्यांना पंढरपूरला अधिवेशनाचा मान मिळालेला आहे. या त्रैवार्षिक अधिवेशनासाठी राज्यभरातून सुमारे चार ते पाच हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती शेकापचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पंढरपूरमध्ये दिली.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि सांगोल्याचे शेकापचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पंढरपुरातील अधिवेशनाच्या तयारीची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी शेकापाच्या अधिवेशनाच्या संदर्भातील माहिती दिली.

शेतकरी कामगार पक्षाचे तीन वर्षांतून एकदा अधिवेशन होते, ती परंपरा आजही कायम असून यंदा हे अधिवेशन पंढरपुरात होणार आहे, या अधिवेशनाच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्ष विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे.

PWP & Jayant Patil
Pune BJP Convention : 'देवाभाऊ म्हणजेच महाराष्ट्राचा विकास'; पुण्याच्या अधिवेशनात दिसली भाजपच्या विधानसभा प्रचाराची झलक

विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे शेतकरी कामगार पक्षाला आता आपल्या आमदारांची संख्या वाढवण्याची गरज भासू लागली आहे. विधानसभेत सध्या शेकापचे एक आमदार असून तेही पक्षासोबत आहेत की नाहीत, याचा कुणालाही थांगपत्ता नाही. विधानसभेत पुरेसे संख्याबळ हाताशी नसल्यामुळे जयंत पाटील यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता.

पराभवानंतर जयंत पाटील यांनी ‘आमची ताकद कमी होती, त्या त्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही,’ अशी हतबलता बोलून दाखवली होती, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आहे.

PWP & Jayant Patil
Pune BJP Convention : 'देवाभाऊ म्हणजेच महाराष्ट्राचा विकास'; पुण्याच्या अधिवेशनात दिसली भाजपच्या विधानसभा प्रचाराची झलक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com