सातारा : सातारा जिल्ह्यात तुमचे भवितव्य राहिलेले नाही. आता ऊसाची आडवा आडवी करू नका, कारण राज्यात शिंदेशाही आली असून एकनाथ शिंदे व फडणवीसांचे राज्य आलेले आहे. हे बळीराजांचे राज्य आले आहे. आता बारामतीकरांचे राज्य संपले आहे, हे आता लक्षात ठेवा, असा सज्जड दम कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी दिला आहे.
कोरेगावचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब साळुंखे यांनी आमदार महेश शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या कार्यक्रमात महेश शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टिकेची झोड उठवली.
महेश शिंदे म्हणाले, आमची ताकत काय हे आम्ही दाखवून दिले आहे. आम्ही त्यांना दिवसा चांदण्या दावल्या. आमच्या नादाला लागले तर आम्ही किती बाद करू शकतो, हे दाखवायचे काम महाराष्ट्राला केले आहे. काहीही झालं तरी महेश शिंदेंना पाडणार असे म्हणत काहीजण फिरत आहेत. राजकारणात हार जीत होत असते. कोणी ताम्रपट घेऊन आलेला नाही. माझा स्वार्थी विचार नाही. जनता जनार्दन ठरवेल मला आमदार करायचा का नाही ते. इथला आमदार ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही.
औंधातील दोनच मते मागा....
बारामतीकरांनी कोरोना काळात नुकता खिशात हात घातला असता तर एकही रूग्ण उपचाराविना मेला नसता, इतकी संपत्ती त्यांना महाराष्ट्राने त्यांना दिली आहे. पण, तुम्ही कोरोना काळात जरंडेश्वर कारखान्यावर यायचे तेथून पलिकडे यमाईचे दर्शन घ्यायचे, तेथून बारामती गाठायची तुम्हाला कोरोनाचा रूग्णच दिसला नाही. त्यामुळे तुम्हाला मते मागायचा अधिकार नाही. तुम्हाला यमाईचे दर्शन घेऊन तेथेच मते मागायचे ऐवढेच राहिले आहे.
त्यामुळे तेथील दोघांचीच मते घ्या, असा टोलाही त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला. ते पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यात तुमचे भवितव्य राहिलेले नाही. आता ऊसाची आडवा आडवी करू नका, आता राज्यात शिंदेशाही आली असून एकनाथ शिंदे व फडणवीसांचे राज्य आलेले आहे. हे बळीराजांचे राज्य आले आहे. आता बारामतीकरांचे राज्य संपले आहे, हे आता लक्षात ठेवा, असा सज्जड दम त्यांनी भरला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.