Shirdi Lok Sabha Seat : शिंदे शिवसेना खासदाराच्या लोकसभा जागेवर बावनकुळेंचा डोळा ? भाजपचा जंगी प्रचार...

Chandrashekar Bawankule News : शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्येच सुप्त संघर्ष सुरू असल्याचे चित्र आहे.
Shirdi Lok Sabha Seat
Shirdi Lok Sabha SeatSarkarnama
Published on
Updated on

Shirdi News : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी 'महाविजय 2024' लोकसभा प्रवासात आज मंगळवार (दि. 28 नोव्हें.) रोजी शिर्डी लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघांतील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील तसेच 'संपर्क से समर्थन' अभियानात भाग घेत सर्वसामान्य जनतेशी संवाद साधतील.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीतील शिंदे शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विद्यमान खासदार असताना भाजपचे संपर्क अभियान होत आहे. यामुळे शिवसेना आणि भाजपमध्येच सुप्त संघर्ष सुरू असल्याचे चित्र आहे. (Latest Marathi News)

शिर्डी लोकसभा मतदारसंघ 2009 ला पुनर्रचनेत अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. तेव्हापासून हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला असून, भाऊसाहेब वाकचौरे (2009), सदाशिव लोखंडे (2014, 2019) निवडून आलेले आहेत.

मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर खासदार लोखंडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटासोबत गेले असल्याने, शिर्डी मतदारसंघ महायुतीकडे आहे. अशात शिर्डी मतदारसंघाची जागा 2024 साठी शिंदे गटाचा दावा असणार आहे.

Shirdi Lok Sabha Seat
BJP News: भाजपतील अंतर्गत वाद उफाळला; राजळे गटाकडून दौंड यांची कोंडी; अकोलकर मैदानात

मात्र, असे असताना भाजपने ठरल्याप्रमाणे मतदारसंघनिहाय 'संपर्क से समर्थन' अभियान शिर्डी लोकसभा मतदारसंघात आज आयोजित केले आहे. त्यामुळे नाही म्हटले तरी शिंदे गटात चलबिचल असू शकते.

नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील 22 जागांवर भाजप उमेदवार लोकसभा लढणार, तर शिंदे-अजित पवार गटाला 11-11 जागा दिल्या जाणार या आशयाची मुलाखत दिल्याने महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या प्रवासात आज प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासोबत लोकसभा क्षेत्रातील तसेच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. सकाळी 10.40 वा. संगमनेर येथे ‘संपर्क से समर्थन अभियानात’, दुपारी 12.00 वा. संगमनेर येथे अकोले, कोपरगाव व संगमनेर विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. दुपारी 03.00 वा. राहता येथे शिर्डी, श्रीरामपूर व नेवासा विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स तथा पदाधिकाऱ्यांशी संवाद बावनकुळे साधतील. यासोबतच ते संघटनात्मक कार्यक्रमात सहभागी होतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shirdi Lok Sabha Seat
Shivsena Vs BJP : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपचे डावपेच; हजार ‘सुपर वॉरियर्सं'ना बावनकुळे देणार कानमंत्र

प्रदेशाध्यक्षांच्या प्रवासाचे नियोजन व तयारी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष तथा लोकसभा प्रवास संयोजक संजय भेगडे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, शिर्डी लोकसभा समन्वयक अरुण मुंडे, शिर्डी लोकसभा प्रमुख राजेंद्र गोंदकर, अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्यासह सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्व प्रमुख पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते करीत असल्याचे बावनकुळे यांच्या संपर्क यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com