shirdi temple News : आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या प्रबंधक यांच्या मार्फत तिरूमला तिरुपती देवस्थान इथे असलेल्या सुरक्षा यंत्रणेचा अहवाल दाखल करण्याचे निर्देश न्या. रविंद्र व्ही घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी गुरुवारी (ता. तीन) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या (High Court News) प्रबंधक यांना दिले आहेत.
कोपरगाव (जि. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी साईबाबा मंदिरासह शिर्डी (Shirdi) परिसरात केंद्रीय पोलिस राखीव बल (सीआरपीएफ) किंवा केंद्रीय सुरक्षा बल (सीआयएसएफ) यांच्या मार्फत सुरक्षा पुरवावी यासाठी (Aurangabad) ॲड. सतीश तळेकर यांच्या मार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्देश दिले.
याचिकेत नमूद की, विविध पोलिस अधिकारी व साईबाबा संस्थानच्या विश्वस्त यांनी वेळोवेळी मंदिराला केंद्रीय पोलिस राखीव बल किंवा केंद्रीय सुरक्षा बल यांच्या मार्फत सुरक्षा देण्यासाठी विविध स्तरावर पाठपुरावा केला. (Marathwada) पण आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
शिर्डी येथे गुन्हेगारीचे प्रमाण रोज वाढत आहे. त्यामुळेच साईभक्तांची सुरक्षा मजबूत करण्याची गरज आहे. याच अनुषंगाने १३ एप्रिल २०२३ रोजी उच्च न्यायालयाने नगरचे प्रधान जिल्हा न्यायाधीश यांनी दाखल केलेला अहवाल लक्षात घेऊन केंद्रीय सुरक्षा बल यांच्याद्वारे सुरक्षा देणे योग्य पर्याय आहे, असे म्हटले होते.
याचिकाकर्त्यांतर्फे प्रज्ञा तळेकर व अजिंक्य काळे काम पाहत आहेत. तर शासनातर्फे ॲड. ज्ञानेश्वर काळे, संस्थानतर्फे ॲड संजय मुंढे काम पाहत आहे. या जनहित याचिकेवर ३१ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.