Shirol Vidhan Sabha Election: विद्यमान आमदाराला मैदान खुलं, अपक्ष की महायुती दोन दिवसात घेणार निर्णय

MLA Rajendra Patil Yadravkar: शिरोळ विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू होती. त्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पक्षातून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू होत्या.
Kolhapur
KolhapurSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: शिरोळ विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर येत आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांना ऑफर देण्यात आली आहे.

महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाला जाणार असल्याने या मतदारसंघात उमेदवार कोण असणार? याची उत्सुकता लागली आहे. मात्र ही जागा यड्रावकर यांच्यासाठी देणार की अन्य उमेदवार देणार याबाबत उत्सुकता आहे. दोनच दिवसात यड्रावकर गटाचा मेळावा होणार असून या मेळाव्यात त्यांची अपक्ष लढणार असल्याची घोषणा होणार आहे. मात्र भाजपच्या एका गटाकडून उमेदवारी मिळवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

शिरोळ विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू होती. त्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पक्षातून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र या दोन्हीही गटाला यड्रावकर यांनी धक्का देत स्वतंत्र पक्षाची घोषणा केली शिवाय अपक्ष लढण्याची ही घोषणा केली होती.

येत्या 24 ऑक्टोबरला यड्रावकर गटाचा मेळावा होणार आहे. त्यामध्ये राजर्षी शाहू आघाडी या पक्षाकडून मैदानात उतरणार आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे गणपतराव पाटील हे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र महायुतीचा चेहरा कोण? याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान यड्रावकर हे अपक्ष रिंगणात उतरणार असून त्याला भाजप आणि शिवसेना पाठिंबा देणार का? याकडे लक्ष लागले आहे.

Kolhapur
Kolhapur North Constituency : ‘कोल्हापूर उत्तर’ची उमेदवारी जयश्री जाधवांना की छत्रपती घराण्यात?; सतेज पाटलांपुढे पेच!

भाजपच्या एका गटांनी यड्रावकर यांच्या अपक्ष उमेदवारीला विरोध केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इचलकरंजी दौऱ्यावर आले असता, यड्रावकर यांना पक्षातूनच उमेदवारी द्यावी. किंवा ते अपक्ष लढणार असतील तर पक्षाचा उमेदवार या ठिकाणी द्यावा अशी मागणी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याजवळ केली आहे. दरम्यान राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अपक्ष लढण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर भाजपचा एक गट काय भूमिका घेण्यात याकडे देखील लक्ष आहे.

आगामी विधानसभा निवडणुकी आपण अपक्ष लढणार असल्याचे शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घोषणा करत महायुती खास करून शिवसेना शिंदे गटाला धक्का दिला होता. त्यानंतर दुसरा धक्का यड्रावकर यांनी महायुतीला देत स्वतंत्र पक्षाची घोषणा करत निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळवून घेतली आहे. यड्रावकर हे राजर्षी शाहू आघाडी या पक्षाकडून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती आहे. येत्या २४ ऑक्टोंबरला यड्रावकर गटाचा मेळावा जयसिंगपूर येथे होणार आहे. या मेळाव्यातच त्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com