Supriya Sule News: मोदींचे आम्ही तुतारी वाजवून आदराने स्वागत करू; सुळेंची खोचक प्रतिक्रिया

PM Modi Rally in Pune on Apr 29: अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे आणि जेवढे काही पाहुणे आपल्याकडे येतील त्यांचा आम्ही तुतारी वाजून आदराने स्वागत करू,' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
PM Modi Rally in Pune on Apr 29
PM Modi Rally in Pune on Apr 29Sarkarnama

Pune News: महाराष्ट्रातील लोकसभेच्या अधिकाधिक जागांवर विजयी मिळवावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अधिकाधिक सभा घेण्याचे नियोजन महायुतीकडून केले जात आहे. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात लोकसभेचे मतदान होत असलेल्या मतदारसंघात मोदींच्या सभांचा झंझावात असणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील 14 उमेदवारांच्या प्रचारासाठी चार दिवसांमध्ये नऊ जाहीर सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. सोमवार 29 एप्रिल आणि मंगळवारी 30 एप्रिल या दोन दिवशी पश्चिम महाराष्ट्रात सहा सभा होणार आहेत. त्यामुळे या दोन दिवसांत पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय (Maharashtra Politics) वातावरण जोरदार तापणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडकवासला मतदारसंघांमध्ये प्रचार दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, निवडणुकीबाबत नागरिकांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे. त्यामुळे आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत असून नागरिक अनेक विषयांवरती चर्चा करत आहेत. दुष्काळाचा विषय गंभीर बनला असून लोक त्याबाबत देखील बोलत आहे. नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. अनेक विषयांवर चर्चा होत आहे. लोक उत्सुक आहेत लोक दुष्काळावर देखील बोलत आहेत. या निवडणुकीमध्ये तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह असून हे चिन्ह सर्वदूर पोचवण्याचं काम लोक स्वतःच करत आहेत.

मी केलेल्या विकासांची कामे स्वतः केली असल्याचं खासदार सांगत असल्याची टीका अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली होती. याला उत्तर देताना सुळे म्हणाल्या, "गेली सतरा-अठरा वर्ष आम्ही एकत्र काम केलं आहे. त्यामुळे जी काही विकास काम केली ती आम्ही एकत्रित केली आहेत.

सुप्रिया सुळे यांनी भोर साठी काय केलं असा सवाल अजित पवार यांनी विचारला होता त्यावरती उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, कदाचित दातांनी माझा अहवाल वाचला नसेल त्यामुळे ते हा प्रश्न विचारत आहेत. गेले अठरा वर्ष मी, दादा, रणजीत शिवतारे आणि संग्राम थोपटे एकत्रितरित्या भोर एमआयडीसीसाठी प्रयत्न करीत आहोत. भोरमध्ये एमआयडीसी आली तर मला आनंदच होईल माझ्या लोकसभा मतदारसंघात सगळीकडेच एमआयडीसी आहे. त्या एमआयडीसी मधील प्रत्येक कंपनीचा भूमिपूजन हे शरद पवारांच्या हस्ते झाला असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

PM Modi Rally in Pune on Apr 29
Kolhapur Politics: मुख्यमंत्र्यांचा रात्रीस खेळ चाले! कदमबांडे, घाटगे यांच्यासोबत खलबतं

पश्चिम महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ ते दहा सभा होत असून महाविकास आघाडीने या भागामध्ये महायुतीसाठी मोठं आव्हान निर्माण केल्याने या सभा घ्याव्या लागत असल्याचं बोललं जात आहे. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे आणि जेवढे काही पाहुणे आपल्याकडे येतील त्यांचा आम्ही तुतारी वाजून आदराने स्वागत करू,' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हे माझ्यासाठी आश्चर्यकारक

महायुतीने पूनम महाजन यांचे तिकीट कापून उज्वल निकम यांना निवडणूक रिंगणात उतरवला आहे. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "पुनम महाजन गेल्या अनेक वर्षांपासून चांगलं काम करीत आहेत. त्या प्रमोद महाजन यांच्या कन्या असून प्रमोद महाजन यांचे खूप मोठं नाव भाजपमध्ये आहे. पुनम महाजन यांनी युवा मोर्चाचं काम केलं आहे. त्यांचे एवढं मोठे काम असताना तिकीट का कापलं? मला माहिती नाही हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे,"

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com