नगरचे शिवसेना नगरसेवक गेले मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला : म्हणाले हेच आमचे गुरू

शिवसेना नगरसेवकांनी काल ( बुधवार ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेऊन आले.
Eknath Shinde, Anil Shinde & Sachin Jadhav
Eknath Shinde, Anil Shinde & Sachin JadhavSarkarnama
Published on
Updated on

अरुण नवथर

अहमदनगर - राज्यातील शिवसेनेत दोन गट पडले आहेत. राज्या प्रमाणेच अहमदनगर महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांतही आता दोन गट स्पष्ट दिसू लागले आहेत. अहमदनगर दक्षिण शिवसेनेच्या नुकत्याच झालेल्या मेळाव्याला अनुपस्थित राहिलेले शिवसेना नगरसेवकांनी काल ( बुधवार ) गुरूपौर्णिमेचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेऊन आले. ही भेटच आता नगर शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. ( Shiv Sena corporator of the town went to meet Chief Minister Shinde: He said this is our Guru )

राज्यातील सत्तानाट्यानंतर मुंबई, ठाणे, उल्हासनगर येथील अनेक नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. नगर शहरातूनही अनेक जण शिंदे गटात जाण्याच्या मार्गावर आहेत. ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांनी नगरसेवक सचिन जाधव, माजी नगरसेवक अनिल लोखंडे यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. शिंदे यांनी थेट ठाणे येथे जाऊन ‘गुरू’वंदन केल्याने नगरमधील शिवसेना नगरसेवकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अगोदर अभेद्य मानल्या जाणाऱ्या शिवसेनेतही दुफळी झाल्याचे दिसते आहे.

Eknath Shinde, Anil Shinde & Sachin Jadhav
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लवकरच जळगाव महापालिकेत धमाका?

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच नगरसेवक शिंदे यांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा केला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना गुरुवंदन केले.

कामठी येथील सरपंच बाळासाहेब आरडे, भिंगारचे प्रकाश फुलारीदेखील उपस्थित होते. टेंभी नाका येथील आनंद दिघे आश्रमात मुख्यमंत्र्यांशी त्याची भेट झाली. नगरसेवक शिंदे हे अनेक वर्षांपासून एकनाथ शिंदे यांचे समर्थक आहेत. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या राजकारणातही ते चांगलेच मुरलेले आहेत. शिवसेना नगरसेवकांची मोट बांधून त्यांनी पत्नी शीला शिंदे यांना महापौरपदावर बसवले होते. याकामी त्यांना एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद लाभला होता. मोलाचे सहकार्य केले होते. महापालिकेत सध्या शिवसेनेचे २४ नगरसेवक आहेत. आता त्यांची पुन्हा मोट बांधून एकनाथ शिंदे गटात सामील होण्यात नगसेवक शिंदे यांना यश मिळेल का, हे काळच ठरवील.

Eknath Shinde, Anil Shinde & Sachin Jadhav
आठवा आमदार न मिळाल्याने गोवा काँग्रेसमधील 'एकनाथ शिंदे' यांचे बंड थंडावले...

मुख्यमंत्री शिंदे आमचे गुरू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे गुरू आहेत. त्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतली. आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ आहोत. त्यामुळे या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये. मुख्यमंत्री शिंदे यांनी बराच वेळ चर्चा केली. त्यात त्यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते अनिल राठोड यांच्या आठवणींना उजाळा दिला. शिंदे यांच्या भेटीनंतर आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले असल्याचे नगरसेवक शिंदे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com