मोठी बातमी : बंडखोर आमदारांसाठी सरकारी अधिकाऱ्याने हॉटेल केलं बुक; अजून बील थकित

बंडखोर आमदार सुरजमधील पंचतारांकित ह़ॉटेलमध्ये राहिले होते.
Eknath Shinde with Shivsena MLA, Eknath Shinde News in Marathi
Eknath Shinde with Shivsena MLA, Eknath Shinde News in Marathisarkarnama
Published on
Updated on

सूरत : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागला आणि ही राजकीय उलधापालथ सुरू झाली. शिंदेंसह काही आमदारांनी थेट सूरत गाठलं. तिथं काही तास थांबल्यानंतर ते गुवाहाटीला गेले. पण आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका सरकारी अधिकाऱ्यानेच बंडखोर आमदारांसाठी सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये 35 खोल्यांचे बुकींग केले होते. पाच दिवस उलटूनही अद्याप हॉटेलचे बील देण्यात आलेले नाही. त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. (Eknath Shinde Latest Marathi News)

शिंदे यांच्यासह शिवसेनेचे (Shiv Sena) जवळपास 20 आमदार वीस तारखेच्या रात्रीच सूरतमध्ये पोहचले. तर 21 तारखेला दिवसभर ते याच हॉटेलमध्ये थांबले होते. तिथे त्यांच्यात आणखी काही आमदार सामील झाले. त्यानंतर 21 तारखेच्या मध्यरात्री त्यांनी विशेष विमानाने गुवाहाटी गाठलं. मागील पाच दिवसांपासून सर्व बंडखोर आमदार तेथील हॉटेलात आहेत.

Eknath Shinde with Shivsena MLA, Eknath Shinde News in Marathi
आषाढीची पूजा कोण करणार, ठाकरे की फडणवीस? न्यायालयाच्या आदेशानंतर वाढली अनिश्चितता

उपलब्ध माहितीनुसार, सुरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये या आमदारांसाठी 35 खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. पण हे बुकिंग कुणाच्या नावाने करण्यात आले होते, याचा खुलासा करण्यात आलेला नाही. हॉटेलमधील नोंदीनुसार एका बेडच्या खोलीला एक नावाने तर डबल बेडच्या खोलीला ए व बी नावाने बुक करण्यात आले होते.

रेकॉर्डसाठी कोणतीही कागदपत्रे घेण्यात आली नाहीत. तसेच डबल बेडच्या खोलीतही एकच आमदार होते. ही बुकींग एका सरकारी अधिकाऱ्याने केल्याची माहिती आहे. त्याने हॉटेलमधील एका उच्चपदस्य अधिकाऱ्या बोलावले होते. बंडखोर आमदार हॉटेलमध्ये आले तेव्हा त्यांच्याकडून कोणतीही कागदपत्रे घेण्यात आली नाहीत.

Eknath Shinde with Shivsena MLA, Eknath Shinde News in Marathi
वकील विशाल आचार्य यांनी पाठवला झिरवळांना मेल; यावरून सुरू आहे न्यायालयात युक्तीवाद

अद्याप बीलही भरण्यात आलेले नाही. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याचा संदर्भ बिलासाठी देण्यात आल्याचे समजते. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनाही आमदारांपासून दूर ठेवण्यात आले होते. केवळ काहीजण वरिष्ठांच्या आदेशाचे केवळ पालन करत होते. हॉटेलचं बिल कोण भरणार, हेही सांगितले जात नाही. हे सरकारी अधिकारी नेमके कोण, हेही अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे आता हा मुद्दा महाराष्ट्रासह गुजरातमध्येही वादाचा ठरू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com