शिवसेनेकडून संभाजीराजेंचा अपमान; तो आम्ही सहन करणार नाही : मराठा संघटना आक्रमक

संभाजी राजे यांना शिवसेना जाणून बुजून पक्षीय राजकारणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे.
 Sambhaji Raje
Sambhaji RajeSarkarnama
Published on
Updated on

पंढरपूर : राज्यसभा (Rajya Sabha) निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhaji Raje) यांना शिवसेनेने (Shivsena) पाठिंबा नाकारल्यानंतर विविध मराठा समाज संघटना आक्रमक झाल्या आहेत. आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला मराठा समाज त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी आज (ता. २४ मे) पंढरपूर येथे बोलताना दिला. (Shiv Sena insults Sambhaji Raje; We will not tolerate it : Maratha organizations)

महेश डोंगरे म्हणाले की, संभाजी राजे यांना शिवसेना जाणून बुजून पक्षीय राजकारणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील २०० विधानसभा मतदारसंघात मराठा समाजाची मोठी ताकद आहे. शिवसेनेने संभाजी राजेंचा अपमान केला आहे, तो आम्ही सहन करणार नाही. आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला त्यांची जागा दाखवून देऊ.

 Sambhaji Raje
संजय राऊतांचा सत्तेचा माज शिवप्रेमी जनता उतरवेल : मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

राज्यातील अपक्ष आमदारांनी संभाजी राजेंना राज्यसभा निवडणुकीत मदत करावी, त्यांच्या भूमिकेला उत्स्फूर्त पाठिंबा द्यावा. अन्यथा आगामी निवडणुकीत पुन्हा तुम्हाला सभागृहात जाऊ देणार नाही. अठरा पगड जातीला बरोबर घेऊन जाणारे छत्रपती संभाजी राजे यांना सर्व पक्षाच्या प्रमुखांनी मदत करावा. नाही तर तुम्हाला जागा दाखवून दिल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही, असा इशारा डोंगरे यांनी दिला आहे.

 Sambhaji Raje
शिवसेनेकडून संजय पवारांची उमेदवारी पक्की?; अनिल देसाईंनी केली कागदपत्रांची तपासणी

चतुर्वेदी, मातोंडकरांना बिनविरोध पाठवता; मग छत्रपतींना विरोध का?

मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र समन्वयक अंकुश कदम म्हणाले की एकीकडे प्रियांका चतुर्वेदी, उर्मिला मातोंडकर यांना अटी शर्थी न टाकता राज्यसभेवर पाठविण्याची तयारी दाखवता. मात्र, ज्या छत्रपतींच्या नावावर एवढी वर्षे राजकारण करत आहात, एवढी वर्ष सत्ता भोगत आहेत. त्या शिवसेनेमधील शिव आमच्या छत्रपतींचा आहे. असं असतानाही संजय राऊत हे संभाजीराजेंच्या अपक्ष उमेदवारीस विरोध करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com