Jyoti Waghmare on Praniti Shinde: 'अति राग अन् भीक माग' अशी प्रणितीताईंची अवस्था होईल! वाघमारेंनी डिवचलं

Maratha Reservation News:मराठा आंदोलक तुमच्या घरी आले होते, तेव्हा तुम्ही त्यांना माझ्याच घरी का आलात? अशा पद्धतीने अरेरावी आणि अपमानास्पद भाषा त्यांनी वापरली. हे समाज विसरलेला नाही.
 Jyoti Waghmare on Praniti Shinde
Jyoti Waghmare on Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur: मराठा आंदोलकांच्या अडून भाजप कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला केल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांनी केला आहे. त्याचा समाचार शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare)यांनी घेतला आहे. "मराठा समाजावर जर तुम्ही असे खोटे आरोप करणार असाल, तर मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही," असा इशारा वाघमारे यांनी दिला.

प्रणिती शिंदे यांनी काल मराठा आंदोलकांना जी दमदाटी केली तिचा मी निषेध करते. प्रणितीताई या आपल्या रागीट स्वभावासाठी संपूर्ण सोलापुरात प्रसिद्ध आहेत. काल मराठा आंदोलकांनी 'तुम्ही आमच्यासाठी कधी आवाज उठवला त्याचा पुरावा दाखवा,' म्हणून आपला रोष त्यांच्यासमोर व्यक्त केला. त्यावेळी प्रणितीताईंना त्यांना 'माझ्या गाडीला हात लावला तर गाठ माझ्याशी आहे,' अशा पद्धतीने दमदाटी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"मराठा आंदोलक तुमच्या घरी आले होते, तेव्हा तुम्ही त्यांना माझ्याच घरी का आलात? अशा पद्धतीने अरेरावी आणि अपमानास्पद भाषा त्यांनी वापरली. हे समाज विसरलेला नाही. प्रणितीताईंकडे संयमाचा अभाव आहे. त्यामुळे एक दिवस अति राग अन् भीक माग अशी प्रणिती ताईंची अवस्था होईल," अशा शब्दांत ज्योती वाघमारे यांनी शिंदेंना टोला लगावला.

प्रणिती शिंदे मराठा आंदोलकांना दमदाटी करतात, त्यामुळे त्यांचा मी जाहीर निषेध करते, असे त्या म्हणाल्या.

आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर गुरुवारी रात्री हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. भाजप कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे. 'ते मराठा आंदोलक नव्हते मराठा आंदोलकाच्या नावाने भाजपचे लोक मराठा समाजाचे आरक्षणाचे आंदोलन बदनाम करीत आहेत," असेही प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे. हा आरोप मराठा क्रांती मोर्चाने फेटाळला आहे.

 Jyoti Waghmare on Praniti Shinde
Parbhani DPDC Fund: आचारसंहिता खर्च करू देईना, अन् मार्च एंड निधीला थांबू देईना!

आमदार प्रणिती शिंदे मराठा समाजाला बदनाम करीत आहेत. त्यांनी मराठा समाजाची माफी मागावी, अन्यथा त्यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा

मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिला. प्रणिती शिंदे यांची ही राजकीय स्टंटबाजी आहे, असे गायकवाड यांनी म्हटलं आहे. प्रणिती शिंदे काल (गुरुवारी) पंढरपूर तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या राज्यभरात लोकप्रतिनिधींना गाव बंद आंदोलन सुरू आहे. गावबंदी असताना गावात येणाऱ्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचे काम सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.

प्रणिती शिंदेंवर हल्ला करणाऱ्याचं समर्थन करणार नाही, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. फक्त मराठा आहे म्हणून जबाबदार धरणं चुकीचं आहे. याच्या पाठीमागे दुसरही काही कारण असू शकते. या संदर्भात मी अनभिज्ञ आहे, मात्र या हल्ल्याचे समर्थन नाही, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com