एकमेव आमदार शहाजी पाटलांच्या बंडामुळे सोलापूर शिवसेनेत खळबळ!

सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील नॉटरिचेबल; पाटील एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातमध्ये
Sahaji patil
Sahaji patilSarkarnama
Published on
Updated on

सांगोला : शिवसेनेचे (shivsena) नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नाराजी नाट्यामुळे राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले सांगोल्याचे शहाजी पाटील (Shahaji Patil) हे असल्याचे आाता निष्पन्न झाले आहे. आमदार शहाजी पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नॉटरिचेबल आढळले. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. (Shiv Sena MLA Shahaji Patil of Sangola is notreachable)

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे, त्याची महाराष्ट्रात जोरदार चर्चा होत असतानाच दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतील १३ आमदार घेऊन गुजरातमध्ये गेल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सोलापूर जिल्ह्यातही शिवसेनेला असाच धक्का बसला आहे. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले आमदार शहाजी पाटील हेही सध्या नॉटरिचेबल आहेत.

Sahaji patil
एकनाथ शिंदेंशी संपर्क झाला, चंद्रकांत पाटील यांनीच सगळी व्यवस्था केलीय! संजय राऊतांचं मोठं विधान

आमदार शहाजी पाटील आणि मंत्री एकनाथ शिंदे यांचे संबंध घनिष्ठ असल्याचे वेळोवेळी सांगत होते. अनेक जाहिराती व बँनरवर आमदार शहाजी पाटील व मंत्री एकनाथ शिंदे यांचे यांचे एकत्रीत फोटोही झळकत होते. तसेच, सांगोला शहरात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याकडून मोठा प्रमाणात निधीही उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळेच सध्या नॉटरिचेबल असलेले शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील हे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच असल्याचे ठामपणे सांगितले जात आहे.

Sahaji patil
एकनाथ शिंदे नॉटरिचेबल झाल्यानंतर भाजपने स्पष्ट केली आपली भूमिका

सध्या सांगोला तालुक्यातही आमदार शहाजी पाटील यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे चर्चांना उधाण आले आहे. आगामी काळात सांगोला  तालुक्यातील राजकीय समीकरणेही बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे हे दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com