
Shiv Sena Satyajit Kadam urges public to boycott elections छ कोल्हापूरला महानगरपालिका घोषित झाल्यापासून शहराची हद्दवाढ झालेली नाही. कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समिती आक्रमक झाली आहे. तर विरोधात हद्दवाढविरोधी कृती कृषी समिती देखील आक्रमक झाली आहे. ग्रामीण आणि शहरी असा वाद निर्माण होत असताना आता शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम यांनीच थेट उघड भूमिका जाहीर केली आहे.
कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ देणार नाही. इतकेच नव्हे तर महापालिकेला इच्छुक असणाऱ्या शहरातील उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज करू नये. लोकांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन कदम यांनी केले आहे.
हद्दवाढ झाल्याशिवाय निवडणूक नको. ज्या गावाची हद्दवाढ प्रस्तावित निश्चित झाली आहे. ती गावे शहरात घ्यावी. नसेल तर लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकावा. इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरू नये. असे आवाहन सत्यजित कदम यांनी केली आहे.
कोल्हापूर शहराच्या पाणी प्रश्नावरून त्यांनी थेट माजी पालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता टीका केली आहे. थेट पाईप लाइन योजना ही बोगस आहे. तिथे बसवण्यात येणाऱ्या मोटार २०१८ला घेतल्या अन् २०२४ ला बसवल्या गेल्या. दीड वर्षापूर्वी तिथेच जाऊन अंघोळ केली आणि गुलाल उधळला. पण अजून कोल्हापूरला पाणी मिळाले नाही. गेली पंधरा वर्ष महापालिकेत ज्यांनी सत्ता गाजवली ते विधानसभेला भुईसपाट झाले. जनतेला माहीत झाल्याने त्याचा पराभव केला. थेट पाइपलाइन मधून पाणी येईल असे वाटत नाही. असा शब्दात कदम यांनी टीका केली आहे.
दरम्यान शिवसेनेत जाण्यापूर्वी सत्यजित कदम हे ताराराणी आघाडीचे प्रमुख नेते होते. मात्र यंदा शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून काम पाहत आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ताराराणी आघाडीची भूमिका काय असेल, हे माजी आमदार महादेवराव महाडिकच ठरवतील. ते भाजपमध्ये विसर्जित करणार का? या प्रश्नावर उत्तर देताना कदम यांनी हे उत्तर दिले आहे. तर आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख हे देखील शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला दुजोरा दिला आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.