Shivsena UBT : सोलापुरात ठाकरे सेनेकडून अनोख्या पद्धतीने वराह जयंती साजरी; ‘राणे अन्‌ त्यांच्या दोन पिल्लांना उकिरड्यात लोळण्याची सवय’

Varaha Jayanti : तो जेव्हा जेव्हा तोंड उघडतो, तेव्हा हिंदू-मुस्लिम भांडण लावणे, राजकारणात नसलेले शब्दप्रयोग करणे, पोलिसांना अरेरावी करणे, अधिकाऱ्यांवर हात उचलणे, असे प्रकार करत असतो.
Solapur Shivsena UBT
Solapur Shivsena UBTSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 25 August : राज्याचे मत्स्यविकास व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी वराह जयंती साजरी करण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. त्यावरून मोठा गदारोळ उठला होता. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोलापुरात अनोख्य पद्धतीने वराह जयंती साजरी करत मंत्री नीतेश राणे यांचा निषेध करण्यात आला. ‘नारायण राणे आणि त्यांच्या दोन पिल्लांना कायम उकिरड्यात लोळण्याची सवय आहे,’ असा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी केला आहे.

शिवसेनेचे महेश धाराशिवकर म्हणाले, आज वराह जयंती आहे. हिंदू धर्मात देवाने वराहाचा अवतार घेतला होता. मात्र, आधुनिक महाराष्ट्रातील कोकणात नीतेश राणे (Nitesh Rane) नावाचा एक मंत्री आहे. तो वराह जयंती साजरी करत आहे. तो स्वतः कायम घाणीत लोळत असतो.

तो जेव्हा जेव्हा तोंड उघडतो, तेव्हा हिंदू-मुस्लिम भांडण लावणे, राजकारणात नसलेले शब्दप्रयोग करणे, पोलिसांना अरेरावी करणे, अधिकाऱ्यांवर हात उचलणे, असे प्रकार करत असतो. त्यांनी परवा मटका अड्ड्यावर छापा टाकण्याचा जो प्रकार केला, तो मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची लाज काढणारा होता. पालकमंत्री स्वतः मटक्याच्या अड्ड्यावर छापा मारतात. कोणाच्या आशीर्वादाने हे धंदे चालतात, असा सवालही शिवसेनेचे (Shivsena UBT)धाराशिवकर यांनी केला आहे.

धाराशिवकर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे वराह पाळले आहेत, त्यामुळे घाणीत लोळणाऱ्या वराहाचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विडंबनात्मक पद्धतीने वराह जयंती साजरी करण्यात येत आहे.

प्रताप चव्हाण म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘देव, देश, धर्माच्या हितासाठी लढण्यासाठी कायम वादग्रस्त भूमिका घेतलेली आहे. नारायण राणे आणि त्यांची दोन पिल्लं. त्यांचा चेंबूरमधील जुगार अड्ड्यावर जन्म झालेला आहे. जेव्हा शिवसेनाप्रमुखांनी राणेंना मुख्यमंत्री केलं. पण मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी मातोश्रीच्या ताट्यात घाण टाकण्याचे काम केले. आता ह्या नकली नेपाळीने वराह जयंती साजरी करण्याचा घाट घातला आहे. आम्ही त्याच्या निषेधार्थ उपरोधिकपणे ही जयंती साजरी करत आहोत.

लोकांनी त्यांना समाजाची आणि राज्याची कामे करण्यासाठी निवडून दिलं आहे. पण, राणे आणि त्यांच्या दोन पिल्लांना कायम उकिरड्यात लोळण्याची सवय आहे. त्यामुळे त्यांनी वराह जयंती साजरी न करता वराह पालनमध्ये जाऊन राहावं, असं मी त्यांना आवाहन करतो. तसेच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नकली नेपाळीचा निषेध करतो, असेही चव्हाण यांनी नमूद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com