शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षाच्या भावाला खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी

पिसे कंपनी सोडून सर्वजण हप्ता देतात, असे म्हणून सोमनाथ पिसे यांची गचांडी धरून मारहाण करण्यास सुरुवात केली.
Shivsena
Shivsena Sarkarnama

बार्शी (जि. सोलापूर) : बार्शीचे शिवसेनेचे (shiv sena) माजी नगराध्यक्ष (कै.) श्रीकांत पिसे यांचे बंधू सोमनाथ पिसे यांना मी माहिती अधिकार अध्यक्ष आहे. खोटा व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर टाकेन. दरमहा 20 हजार रुपये खंडणी दिली नाही; तर जीवे मारेन, अशी धमकी देणाऱ्या दोघांविरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. (Shiv Sena's Barshi Former council chairman's brother threatened to kill for ransom)

प्रवीण नवनाथ रिकिबे (रा. राऊत चाळ, बार्शी) असे पोलिसांनी अटक केलेल्या एका खंडणीखोराचे नाव आहे. विकी डबडे (रा. दत्तनगर, बार्शी) अशी गुन्हा दाखल झालेल्या दुसऱ्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी माजी नगराध्यक्ष पिसे यांचे बंधू सोमनाथ पिसे (वय 52, रा. सुभाषनगर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना ११ मार्च रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान तेलगिरणी चौकात घडली आहे.

Shivsena
भाजपच्या ‘त्या’ नीतीमुळेच आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाही : जयंत पाटील

पिसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बार्शीमध्ये   तू मोठी मालमत्ता कमावली आहेस. मी मानव अधिकार संघटनेचा अध्यक्ष आहे. तुझा पुतण्या वैभव पिसे यालाही पैसे मागितले होते, त्यानेही हप्ता दिलेला नाही. पिसे कंपनी सोडून सर्वजण हप्ता देतात, असे म्हणून सोमनाथ पिसे यांची गचांडी धरून मारहाण करण्यास सुरुवात केली. तुला बार्शीत राहू देणार नाही. कोठे मारुन टाकीन हेसुद्धा तुला कळू देणार नाही. पूर्वी एक खून पचवला आहे. तुझा एक व्हिडिओ तयार करीन अन् सोशल मीडियावर टाकीन, अशी धमकी देण्यात आली.

Shivsena
चक्क ग्रामपंचायत सदस्यानेच घेतले अफूचे पीक!

बार्शीचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार तपास करीत आहेत. दरम्यान, माजी नगराध्यक्षांच्या भावाला खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com