Shivendraraje Bhosale : शेतकऱ्यावर आभाळ कोसळलं; शिवेंद्रराजेंनी दुःखं हलकं केलं...

Satara News : अचानक आलेल्या पावसात वीज पडल्याने पाच जनावरे जागीच ठार झाली. यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.
Shivendraraje Bhosale
Shivendraraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

Satara Political News : सातारा तालुक्यातील सांडवली (वारसवाडी) येथील दूध व्यावसायिक शेतकरी सीताराम जानकर यांची पाच जनावरे वादळी पावसात वीज पडल्याने जागीच ठार झाली होती. यात शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले होते. या घटनेची माहिती सातारा, जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मिळाल्यानंतर त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य राजु भोसले यांच्या माध्यमातून जानकर यांना एक लाखांची आर्थिक मदत मिळवून दिली. शिवेंद्रसिंहराजेंच्या या कार्यतत्परतेची सध्या तालुक्यात चर्चा होत आहे. Shivendraraje Bhosale

सांडवली (ता. सातारा) येथे नुकताच झालेल्या वळीव पावसाचा जनावरांना फटका बसला हाेता. येथील दूध व्यावसायिक सीताराम जानकर यांच्या चार गायी व एक बैल अशी पाच जनावरे चरण्यास नेली होती. यावेळी अचानक आलेल्या पावसात वीज पडल्याने ही जनावरे जागीच ठार झाली. यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. Satara News

या प्रकाराची माहिती आमदार शिवेंद्रराजे भोसले Shivendraraje Bhosle व माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पंचनामा करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पंचनामा केला .मात्र, दुर्गम भागातील उपजिविकेचे साधनच हरवल्यावर काय परिस्थिती होते, याची जाणीव असल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुचनेनुसार राजु भोसले यांच्या माध्यमातून सीताराम जानकर यांना आर्थिक मदत मिळाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shivendraraje Bhosale
Gajanan Kirtikar News : गजानन कीर्तीकरांची 'घरवापसी' ? परब-राऊत धावले मदतीला तर शिरसाटांचे कारवाईचे संकेत

यावेळी मदत सुपूर्द करताना माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसिलदार नागेश गायकवाड, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, गट शिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे, पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिल चपणे, परळीच्या पशुवैद्यकीय अधिकारी अर्चना नेवसे उपस्थित होते. सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील अतिदुर्गम भागात झालेल्या या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले होते. मात्र, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या तत्परतेमुळे अशा दुर्गम गावात थेट मदत निधी पोहोचल्याने समाधान व्यक्त होत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Shivendraraje Bhosale
Hit And Rune Case : 'होय, पोलिस ठाण्यात पिझ्झा नेला, पण कोणासाठी?'; प्रत्यक्षदर्शी शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com