Gajanan Kirtikar News : गजानन कीर्तीकरांची 'घरवापसी' ? परब-राऊत धावले मदतीला तर शिरसाटांचे कारवाईचे संकेत

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : लोकसभा निवडणुकीत मुंबई राखण्यासाठी शिवसेनेचे शिंदे गट आणि ठाकरे गटाने एकमेकांना चेक देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने शिंदे गटाचे नेते माजी खासदार गजानन कीर्तीकरांचा मुलगा अमोल कीर्तीकरांना उमेदवारी देऊन पहिला डाव टाकला.
Eknath Shinde, Gajanan Kirtikar, Uddhav Thackeray
Eknath Shinde, Gajanan Kirtikar, Uddhav ThackeraySarkarnama

Maharashtra Political News : शिंदे गटाचे नेते माजी खासदार गजानन कीर्तीकरांवरून शिवसेनेच्या दोन्ही गटात घमासान सुरू आहे. शिंदे गटात काही मिळणार नाही, याची जाणीव झाल्यानेच कीर्तीकरांनी लोकसभा निवडणुकीत अमोल कीर्तीकरांना मदत केली. तर त्यांच्यातील मूळ शिवसैनिक जागा झाल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. दरम्यान, निवडणुकीतील संशयास्पद भूमिकेवरून शिंदे गट कीर्तीकरांवर कारवाईच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. यातून कीर्तीकर ठाकरे गटात परतण्याची चर्चा सुरू झाली आहे. Gajanan Kirtikar News

लोकसभा निवडणुकीत मुंबई राखण्यासाठी शिवसेनेचे शिंदे गट आणि ठाकरे गटाने एकमेकांना चेक देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने शिंदे गटाचे नेते माजी खासदार गजानन कीर्तीकरांचा मुलगा अमोल कीर्तीकरांना Amol Kirtikar उमेदवारी देऊन पहिला डाव टाकला. त्यातून कोंडी झाल्याने शिंदे गटाकडून रवींद्र वायकरांना रिंगणात उतरवावे लागले. Uddhav Thackeray Vs Eknath Shinde

यावर आपण धर्मसंकटात सापडलो असलो तरी राजधर्म पाळणार असल्याचे कीर्तीकरांनी Gajanan Kirtikar स्पष्ट केले. प्रत्यक्षात मात्र त्यांनी न्यूट्रल भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. कीर्तीकरांच्या या भूमिकेमुळे वायकरांना फटका बसणार आणि अमोल कीर्तीकरांना फायदा होणार अशी चर्चा सुरू आहे. यावरून आता ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आला असून लवकरच कीर्तीकर निर्णायक भूमिका घेतील, असा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde, Gajanan Kirtikar, Uddhav Thackeray
LokSabha Elections 6th Phase Voting : धक्कादायक! मंत्र्याचेच नाव मतदारयादीत नाही; तब्बल 20 मिनिटे रांगेत उभे...

ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत Sunil Raut म्हणाले, कीर्तीकरांना कारवाईचा फरक पडणार नाही. त्यांनी आपल्या मुलाला आशीर्वाद दिला आहे. तर गजानन कीर्तीकारांमधील खरा शिवसैनिक आता हळूहळू जागा होतोय, असे सूचक विधान माजी मंत्री अनिल परब Anil Parab यांनी केले आहे. तसेच शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी कीर्तीकरांच्या भूमिकेवर संशय असून त्यांच्याबाबत दोन दिवसात निर्णय होणार असल्याचे सांगितले. दोन्ही गटातील नेत्यांनी केलेल्या या विधानांमुळे आता कीर्तीकर नेमकी काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Eknath Shinde, Gajanan Kirtikar, Uddhav Thackeray
Chandrakant Khaire News : शांतीगिरी महाराजांचा पराभव केला अन् खैरेंना मिळाले नवे नाव...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com