Shivendraraje Bhosale News: शिवेंद्रराजेंनी शब्द पाळला; मेढा नगरपंचायतीची कर मुल्यनिर्धारण प्रक्रिया स्थगित

Medha News: मेढा नगरपंचायतीच्या हद्दीतील सर्व मिळकतधारांचा सर्व्हे पूर्ण करून कर निर्धारण यादी अंतिम करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.
MLA Shivendraraje Bhosale
MLA Shivendraraje Bhosalesarkarnama

Satara News : मेढा नगरपंचायतीच्या अन्यायकारक कर मुल्यनिर्धारण विरोधात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तेव्हाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली होती. नगरविकास विभागाने नुकताच रीतसर अध्यादेश काढून मेढा नगरपंचायतीच्या कर मुल्यनिर्धारण प्रक्रियेस स्थगिती दिल्याचे जाहीर केले. शिवेंद्रसिंहराजेंनी मेंढावासियांना दिलेला शब्द पाळला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

गेल्या काही दिवसांपासून घरपट्टीवाढीचा मुद्दा गाजत होता. मेढा नगरपंचायतीच्या हद्दीतील सर्व मिळकतधारांचा सर्व्हे पूर्ण करून कर निर्धारण यादी अंतिम करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. नागरिकांनी आंदोलनही केले होते. त्याचवेळी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी नागरिकांच्या मागणीनुसार सातारा दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सातारा पालिका आणि मेढा नगरपंचायतीच्या कर मुल्यनिर्धारण प्रक्रियेस स्थगिती देण्याची मागणी केली होती.

शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीवरून मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याचवेळी सातारा पालिका आणि मेढा नगरपंचायत या दोन्ही संस्थांच्या करवाढ प्रक्रियेस स्थगिती देण्याचे तोंडी आदेश दिले होते.दरम्यान, शासनाच्या कार्यालयीन प्रक्रियेनुसार मेढा नगरपंचायतीच्या कर मुल्यनिर्धारण प्रक्रियेस स्थगिती देण्याचा अध्यादेश राज्याच्या नगरविकास विभागाकडून नुकताच काढण्यात आला आहे.

MLA Shivendraraje Bhosale
Satara : नवीन उद्योगांसह रोजगार निर्मिती होणार; शिवेंद्रसिंहराजेंची उद्योग मंत्र्यांशी चर्चा

मेढा नगरपंचायतीने सुरु केलेल्या कर मुल्यनिर्धारण प्रक्रियेस चालू असलेल्या टप्प्यावर शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात येत असून नगरपंचायतीने सदर प्रक्रिया स्थगित ठेवून याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास सादर करावा, असे आदेश नगर विकास विभागाचे कार्यासन अधिकारी वि. ना. धाईजे यांनी मेढा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे मेढा नगरपंचायतीच्या करवाढ प्रक्रिया स्थगिती बाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

MLA Shivendraraje Bhosale
Satara : मी शब्द पाळणारा आमदार; कदमांनी फुकटची काळजी करू नये : शिवेंद्रसिंहराजे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com