Satara News : गिरणी कामगारांच्या घरांसाठी शिवेंद्रसिंहराजेंचा पुढाकार; साताऱ्यात मेळाव्याचे आयोजन

Satara Zilla Parishad सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी (ता. २ जानेवारी) मेळाव्याचे आयोजन केले आहे.
MLA Shivendraraje Bhosale
MLA Shivendraraje Bhosalesarkarnama

Satara News : गिरणी कामगारांना मुंबईत हक्काची घरे मिळवून देण्यासाठी तसेच कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेतला आहे. कामगार व वारसांच्‍या पात्रता निश्चितीसाठी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी (ता. २ जानेवारी) मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा कामगार सहनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे व म्हाडाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

जिल्ह्यातील गिरणी कामगारांच्या Mill Workers हक्काच्या घरांचा प्रश्न प्रलंबित आहे. गिरणी कामगारांना मुंबईत घरे मिळवून देण्यासाठी तसेच कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांनी गिरणी कामगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

या मेळाव्याला येताना संबंधित कामगार किंवा वारसांनी गिरणी कामगारांचे ओळख पत्र, तिकीट नंबरची प्रत, सर्व्हिस प्रमाणपत्र, लाल पास, प्रॉव्हिडंट फंड क्रमांक, इ.एस.आय.सी. क्रमांक, मिल प्रमाणपत्र प्रत, हजेरी पत्र, लीव्ह रजिस्टर प्रत, उपदान प्रदान आदेश, भविष्य निर्वाह निधी सेटलमेंट आदेशाची प्रत, पगार पावती, आधार कार्ड आदी कागदपत्रे घेऊन यावीत, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

कागदपत्र गहाळ असणे अथवा कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असणे आदी समस्यांचा निपटारा करण्यासाठी मेळाव्याच्या ठिकाणीच तक्रार निवारण केंद्र सुरु केले जाणार आहे. त्यामुळे कागदपत्र नसणे अथवा त्यासंदर्भात काही तक्रारी असणाऱ्या कामगार किंवा त्यांच्या वारसांच्या तक्रारींचा निपटारा जागेवरच करण्यात येणार असून या सुविधेचा लाभ गिरणी कामगार, वारसांनी घेण्‍याचे आवाहनही करण्‍यात आले आहे.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Edited By : Umesh Bambare

MLA Shivendraraje Bhosale
Satara News : वाहतूकीची समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी रस्त्यावर; घेतला हा निर्णय...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com