Satara Lok Sabha Constituency: शिवेंद्रसिंहराजेंनी लावली ताकत पण कार्यकर्ते नाराज; सातारा-जावळीत कुणाची कॉलर ताठ?

Satara Lok Sabha Constituency Shashikant Shinde vs Udayanraje Bhosale: भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंच्या मताधिक्यासाठी जोरदार प्रयत्न केला. शिवेंद्रसिंहराजेंनी प्रयत्न केला असला तरी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात आतापर्यंत उदयनराजेंनी दिलेला त्रास घर करुन आहे.
Udayan Raje Bhosale,  Shivendra Singh Raje, Shashikant Shinde
UdayanRaje Bhosale, Shivendra Singh Raje, Shashikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

Satara-Jawali Constituency : सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हेच पुन्हा लोकसभेच्या रिंगणात आले. त्यांना फाइट देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आपल्याकडचा हुकमी एक्का काढला तो म्हणजे शशिकांत शिंदेंना मैदानात उतरवले परिणामी या हाय व्होल्टेज लढतीत प्रचंड चुरस आली. त्यामुळे सातारा मतदारसंघा हा राज्यातील लक्षवेधी ठरला.

या मतदारसंघातून कोण बाजी मारणार याचा निकाल येण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी उरला असताना सातारा-जावळी मतदारसंघ कोणाला धक्का देणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजपचे (BJP) आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा हा मतदारसंघ असून उदयनराजेंच्या मताधिक्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रयत्न केले असली तरी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात आतापर्यंत उदयनराजेंनी दिलेला त्रास आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत झालेला वेदांतिकाराजे भोसले यांचा पराभव घर करुन होता. त्यामुळे या नाराजीचा परिणामदेखील या मतदारसंघात पहायला मिळेल. तर दुसरीकडे जावळीकरांनी शशिकांत शिंदेंना (Shashikant Shinde) किती साथ दिली? याची उत्सुकता आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघ हे मोठे मतदारसंघ आहेत. येथे मतमोजणीच्या 23 फेऱ्या होणार असून हा मतदारसंघ खासदार उदयनराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे यांचे होम ग्राउंड आहे. पण, येथे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे मोठे वर्चस्व आहे. त्यांनीयावेळेस लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना मताधिक्य देण्याचा निर्धार केला आहे.

पण, त्यांच्या कार्यकर्त्यांत मात्र, उदयनराजेंविषयी नाराजीचा सूर होता. हा सूर अजिंक्यतारा कारखान्यांवरील जाहीर सभेत उमटला होता. उदयनराजेंनी गेल्या पाच वर्षात आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रमुख कार्यकर्त्यांना दिलेला त्रास आणि सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत केलेला वेदांतिकाराजे भोसले यांचा पराभवाची सल आजही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे. ही सल या लोकसभेच्या निवडणुकीत निघणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु, याबाबत कोणीही उघड बोलत नाही.

Udayan Raje Bhosale,  Shivendra Singh Raje, Shashikant Shinde
Satej Patil : लोकसभेच्या सलग तिसऱ्या निवडणुकीत कोल्हापुरात ‘सतेज’ करिष्मा; हायकमांडलाही भूरळ!

सध्या सातारा व जावळी तालुक्यात तुतारीचीच चर्चा सुरु आहे. शशिकांत शिंदे यांचे जावळी तालुक्यातील हुमगाव हे मुळगाव आहे. यापूर्वी जावळी, महाबळेश्वरचे ते आमदार होते. त्यामुळे त्यांचा या भागात चांगला संपर्क आहे. जावळीत माथाडी कामगार, कामानिमित्त असलल्या चाकरमान्यांशीही चांगले संबंध आहेत. त्यामुळे जावळीतून त्यांनाचांगल्या मताधिक्याची अपेक्षा आहे.

उघडपणे सर्वांनीच उदयनराजेंचे काम केल्याचे सांगितले असले तरी सातारा शहरात कमी झालेले मतदान पाहता येथे उदयनराजेंचे मताधिक्य कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सातारा-जावळीतून मताधिक्य घेणारा उमेदवार विजयी होणार आहे. मागील वेळी उदयनराजेंना 47 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. आता यावेळेस शशिकांत शिंदे त्यांच्याविरोधात असल्याने उदयनराजेंचे मताधिक्य घटणार की वाढणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात कुणाची कॉलर ताठ राहणार याची उत्सुकता अनेकांना आहे.

Udayan Raje Bhosale,  Shivendra Singh Raje, Shashikant Shinde
Raju Shetti: डोळ्यात तेल घालून बघा, बॅलेट पेपरवर लक्ष द्या, खातरजमा करा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com