Shivrajyabhishek Sohla at New Shahu Palace: शिवराज्याभिषेक दिन यावर्षीपासून कोल्हापूरच्या राजवाड्यातही साजरा होणार !

Kolhapur News: श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी स्वत:या तयारीची पाहणी केली.
Kolhapur Shahu Palace
Kolhapur Shahu PalaceSarkarnama
Published on
Updated on

Shivrajyabhishek Sohala News: राज्य सरकारच्यावतीने दोन दिवसांपूर्वी (४ जून) स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. त्यानंतर आता कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती उद्या (६ जून) रायगडावर शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek) सोहळा साजरा करणार आहे.

कोल्हापूरच्या नवीन राजवाड्यात शाहू महाराज, मालोजीराजे आणि संपूर्ण छत्रपती घराण्यातील सदस्यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. नवीन राजवाड्यावर पहिल्यांदाच हा शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishesk Sohla) सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. शिवराज्यभिषेक दिनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी स्वत:या तयारीची पाहणी केली.

Kolhapur Shahu Palace
Rohit Pawar Slams Mungantiwar: एकेरी उल्लेखांवरुन मुनगंटीवारांना पवारांच्या कानपिचक्या ; फेसबूक पोस्ट व्हायरल..

उद्या सकाळी ठीक साडेसात वाजल्यापासून या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. यापूर्वी दरवर्षी जुन्या राजवाड्यात साध्या पद्धतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत होता. पण या यावर्षीपासून नवीन राजवाड्यावर हा सोहळा साजरा होणार असल्याची माहिती शाहू महाराज यांनी दिली आहे. (Yuvraj Sambhajiraje Chhatrapati)

यावर्षी होणारा शिवराज्याभिषेक सोहळा हा 349 वा राज्याभिषेक सोहळा असेल. असे स्वत: शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोन्याच्या मुर्तीवर अभिषेक करण्यात येणार आहे. राज्यभरातून खूप मोठ्या संख्येने शिवप्रेमी या शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थिती लावणार असल्याचही शाहू महराजांनी सांगितलं आहे. (Kolhapur News)

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com