Rohit Pawar Slams Mungantiwar: एकेरी उल्लेखांवरुन मुनगंटीवारांना पवारांच्या कानपिचक्या ; फेसबूक पोस्ट व्हायरल..

NCP News : वाचाळवीरांना आवर घालण्याची गरज असताना आपणही त्यांच्यासारखंच वागत असाल तर हे निश्चितच दुःखद आहे.
Rohit Pawar Slams Sudhir Mungantiwar
Rohit Pawar Slams Sudhir MungantiwarSarkarnama

NCP News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या दोन भाजप नेत्यांवर शरद पवार यांचे नातू, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खडे बोल सुनावले आहे. समाजमाध्यमातून रोहित पवार यांनी भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे भावना व्यक्त केल्या आहेत.

भाजप आमदार गोपीचंद्र पडळकर यांनी शरद पवार यांचा आपल्या भाषणात अनेकदा एकेरी उल्लेख केला आहे. सोलापूर जिल्ह्यात धनगर समाजाच्या मेळाव्यात त्यांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला. भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही,'ओ हमे ज्ञान सिखायेगा' असा एकेरी उल्लेख पवार यांच्याबाबत केला होता.

Rohit Pawar Slams Sudhir Mungantiwar
Shirur Lok Sabha Constituency : शिरुर लोकसभेसाठी कोल्हे कि लांडे ? ; खुद्द शरद पवारांनी जाहीर केला उमेदवार

फेसबूक पोस्टकरुन मुनगंटीवार यांना रोहित पवारांनी कानपिचक्या दिल्या आहेत. "मुनगंटीवार साहेब महाराष्ट्राची एक सुसंस्कृत राजकीय परंपरा आहे. परंतु मागच्या काही वर्षापासून ही संस्कृती व परंपरा लयाला जात असल्याचं दिसतंय. राजकीय प्रसिद्धीसाठी आणि पदांच्या लालसेने अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या काही तरुण नेत्यांनी तर सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत आणि यात मोजके जुने नेतेही आहेत. अशा स्थितीत आपल्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याने वाचाळवीरांना आवर घालण्याची गरज असताना आपणही त्यांच्यासारखंच वागत असाल तर हे निश्चितच दुःखद आहे," असे पवारांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Rohit Pawar Slams Sudhir Mungantiwar
NCP Meeting IN Pune : अजितदादांनी कार्यकर्त्यांना दम भरला ; तिकीटावरुन भांडलात तर कानाखाली आवाज काढेन..

गेल्या वर्षी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना साजरा झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीस शरद पवार उपस्थित होते. त्यावेळी जयंती सोहळ्याची सर्व सूत्रे रोहित पवार यांच्या हातात होती. त्यावेळी चौंडीकडे निघालेल्या गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना वाटेतच अडवले होते तर कर्जत-जामखेडचे माजी भाजप राम शिंदे यांच्यावर पोलिसांचे बारीक लक्ष होते.

दरम्यान गेल्यावर्षी राज्यात शिवसेनेतील बंडखोरी नंतर सत्ता बदल झाला आणि यावर्षीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीची सर्व सूत्रे विधानपरिषद राम शिंदे यांच्याकडे स्वागताध्यक्ष या नात्याने आली. या कार्यक्रमास उपस्थित असलेले मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर ही नामांतराची घोषणा झाली, त्याच बरोबर कार्यक्रमा दरम्यान शिंदे-फडणवीस यांनी पडळकरांचे कौतुक केले.

Rohit Pawar Slams Sudhir Mungantiwar
Hanumant Pawar Slams Sudhir Mungatiwar : पवारांचा एकेरी उल्लेख, मुनगंटीवारांवर काँग्रेस संतप्त ; 'सत्तेच्या मस्तीतून ..'

या शरद पवारांबद्दल भाजपच्या काही नेत्यांकडून होत असलेल्या एकेरी उल्लेखा मागे काही राजकीय अजेंडा आहे का, यावर चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन दहा जून रोजी आहे, मात्र त्या अगोदर 9 जून रोजी नगर शहरात वर्धापन दिनाचा भव्य सोहळा शरद पवारांच्या उपस्थित आयोजित केला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com