सुनील केदारांना हायकोर्टाचा दणका : 'दूध पंढरी' वरील पापळांची नियुक्ती रद्द

तीन अधिकाऱ्यांचे प्रशासकीय मंडळ दूध संघावर आले आहे.
Sunil Kedar
Sunil Kedarsarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया सहकारी संघावर प्रशासक म्हणून शिवराम पापळ (Shivram Papals) यांची नियुक्ती करण्यात आली होती. उच्च न्यायालयात आज (ता. ६ ऑक्टोबर) झालेल्या सुनावणीत ही नियुक्ती मागे घेत असल्याचे पत्र दुग्धविकास विभागाने आज सादर केले आहे. (Shivram Papals appointment on canceled)

Sunil Kedar
चार वर्षांच्या मुलीनं काढलेल्या ईश्वरचिठ्ठीनं ठरवलं काँग्रेस अन् शिवसेनेच्या उमेदवाराचं भविष्य

पापळ यांची नियुक्ती रद्द झाल्याने दूध संघावर आता पुन्हा एकदा श्रीनिवास पांढरे, आबासाहेब गावडे आणि सुनील शिंदे या तीन अधिकाऱ्यांचे प्रशासकीय मंडळ कार्यान्वित झाले आहे. दूध संघावर प्रशासक नियुक्त करण्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा किंवा मंजुरी देण्याचा अधिकार राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना आहे का?, मंत्र्यांनी प्रशासक नियुक्तीत हस्तक्षेप करण्याचा कायदेशीर अधिकार कायद्यात आहेत का ? या बद्दल आजच्या सुनावणीत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश आज उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. जे. काथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी दिले होते. त्यानूसार दुग्ध विकास विभागाने प्रशासक पापळ यांची नियुक्तीच मागे घेत असल्याचे पत्र न्यायालयात सादर केले.

Sunil Kedar
लिटमस टेस्टमध्ये कॉंग्रेस पास, सुनील केदारांनी सिद्ध केला दबदबा…

तीन अधिकाऱ्यांचे प्रशासकीय मंडळ दूध संघावर आले आहे. या मंडळाने धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत. दूध संघाचा दैनंदिन कारभार फक्त पहावा. दूध संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक तातडीने घ्यावी यासाठीही न्यायालयाने निर्देश दिले आहेत. अशी माहिती अॅड. अभिजित कुलकर्णी यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com