चार वर्षांच्या मुलीनं काढलेल्या ईश्वरचिठ्ठीनं ठरवलं काँग्रेस अन् शिवसेनेच्या उमेदवाराचं भविष्य

राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे.
 Shiv Sena, Congress
Shiv Sena, Congresssarkarnama
Published on
Updated on

वाशिम : राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये झालेल्या जिल्हा परिषद (Zilla Parishad Election) आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. ही पोटनिवडणुक सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची आहे. या निकालाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले होते. नागपूर, पालघर, धुळे, नंदूरबार, अकोला आणि वाशिमच्या (Washim) जिल्हा परिषदेसाठी मतमोजणी सुरु आहे. अनेक ठिकाणचे निकाल जाहीर झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या ८५ आणि पंचायत समितीच्या १४४ जागांचा निकाल घोषित होत आहे.

 Shiv Sena, Congress
अरोली-कोदामेंढीत कॉंग्रेसचे देशमुख विजयी, भाजपचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर...

हे निकाल घोषीत होत असताना अकोट तालुक्यातील अकोलखेड पंचायत समिती गणातून ईश्वरचिठ्ठीने विजयी उमेदवार ठरवण्यात आला. या ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवाराला समान मते मिळाली होती. शिवसेनेकडून सूरज गणभोज आणि काँग्रेसकडून दिगंबर पिंप्राळे निवडणुकीच्या रिंगणात होते. यामुळे महाविकास आघाडीतील या दोन्ही पक्षामध्येच येथे सुरस पाह्याला मिळाली.

सुरुवाती पासुनच या ठिकाणा या दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होती. गणभोज व पिंप्राळे यांना समान मते मिळाली. त्यामुळे ईश्वरचिठ्ठीने विजयी उमेदवार ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला. चार वर्षाच्या मुलीच्या हातून ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये शिवसेनेचे सूरज गणभोज याचे नाव आले. त्यानंतर त्यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले.

 Shiv Sena, Congress
ZP Election : नंदुरबारमध्ये सत्ता राखली, पण शिवसेनेचं उपाध्यक्षपद धोक्यात

दरम्यान, वाशिम जिल्हा परिषदेच्या १४ गटाचे निकाल जाहीर झाले असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. १४ जागांपैकी ५ जाग्यावर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ५, भाजप- २, शिवसेना- १, काँग्रेस- २, वंचित - २, इतर- २ जागा मिळाल्या. जाहीर निकाल असे, उकळी पेन गट- सुरेश मापारी (शिवसेना), कवठा सर्कल गट- वैभव सरनाईक (काँग्रेस), काटा गट- संध्याताई देशमुख ( काँग्रेस), भामदेवी गट - वैशाली लळे (वंचित आघाडी), पांघरी नवघरे गट- लक्ष्मी लहाने (वंचित), असेगाव गट - चंद्रकांत ठाकरे (राष्ट्रवादी), भर जहागीर गट- अमित खडसे (राष्ट्रवादी), कंझरा गट- सुनीता कठोले (राष्ट्रवादी), दाभा गट - राजेश राठोड (राष्ट्रवादी), तळप गट- शोभा गावंडे (राष्ट्रवादी), कुपटा गट- उमेश ठाकरे (भाजप), फुल उमरी गट- सुरेखा चव्हाण (भाजप), पार्डी गट- स्वरस्वती चौधरी (अपक्ष), गोभणी गट- पूजा भुतेकर (जनविकास आघाडी)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com