Shivsena Convention : कोल्हापुरात लागले तीन हजार बॅनर्स, राजेश क्षीरसागरांनी साधला अधिवेशनाचा मुहूर्त

Rajesh Kshirsagar : शिवसेनेचे कोल्हापुरात पहिल्यांदाच राष्ट्रीय अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनामुळे कोल्हापुरातील राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे महत्व वाढले आहे.
Shivsena Convention
Shivsena Convention sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur : शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन आज (शुक्रवारी) कोल्हापुरात पार पडत आहे. त्या निमित्ताने कोल्हापुरात शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. अधिवेशनासाठी शिवसेनेचे 9 मंत्री, 13 खासदार आणि 43 आमदार उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या राष्ट्रीय महाअधिवेशनाला सुरुवात होईल. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरासह जिल्हाभरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. शहरात जवळपास तीन हजार पेक्षा जास्त बॅनर्स लावण्यात आले आहेत. (Shivsena Convention)

Shivsena Convention
Maratha Reservation : मोठी बातमी ! राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सादर

शिवसेनेचे (Shivsena) कोल्हापुरात पहिल्यांदाच राष्ट्रीय अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनामुळे कोल्हापुरातील राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर ( Rajesh Kshirsagar) यांचे महत्व वाढले आहे. ते नियोजनापासून ते गांधी मैदान येथील सभेपर्यंतच्या नियोजनाची बाजू सांभाळत आहेत. दरम्यान याच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजेश क्षीरसागर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या जोडण्या आखायला सुरुवात केली आहे. शहरभर बॅनर लावून आपली शक्ती दाखवत आहेत.

शहरात जवळपास तीन हजार डिजिटल बॅनर लावण्यात आले आहेत. बाळासाहेब ठाकरे,आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे एकूण शहरात 40 कट आउट लावण्यात आले आहेत. 73 होर्डिंग डिजिटल फलक, 34 कमानी, 700 डिव्हाइडर फलक आणि 400 डिजिटल फ्लेक्स एकट्या क्षीरसागर यांच्याकडून लावण्यात आले आहेत. राज्य आणि देशभरातून येणाऱ्या शिवसैनिकांवर प्रभाव पडण्यासाठी, शिवसेनाप्रती प्रेम निर्माण होण्यासाठी भव्य वातावरण निर्मिती करण्यात आली आहे.

100 हाॅटेल्स बुक

महाअधिवेशन कोल्हापुरमध्ये होत असल्याने जिल्ह्यातील सुमारे 100 हून अधिक हॉटेल मधील दोन हजार खोल्यांचे बुकिंग शिवसेनेकडून करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांसह या अधिवेशासाठी नऊ मंत्री, 43 आमदार, 13 खासदार येणार आहे. शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे अधिवेशनासाठी गुरुवार (ता.15) पासूनच कोल्हापुरामध्ये येण्यास सुरवात झाली होती.

Shivsena Convention
Maratha Reservation : जरांगे पाटलांची तब्येत खालावली; मुख्यमंत्री शिंदे मोठा निर्णय घेणार ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com