शेवटच्या अर्ध्या तासात असे काही घडले की मुश्रीफ-सतेज पाटलांचे डावपेच उधळले..

शिवसेनेने स्वतंत्र पॅनेल टाकल्याने कोल्हापूर Bank बिनविरोध निवडीसाठीचे प्रयत्न फोल. सत्ताधारी आघाडीची कोंडी
Hasan Mushriff-Satej Patil

Hasan Mushriff-Satej Patil

Sarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची (Kolhapur District Bank) निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आणि शिवसेनेला काही जागा देण्यासाठी त्यांना विचारले असता, शिवसेनेने (Shivsena) आमचे पॅनेल जाहीर झाले आहे. तुम्ही तुमचे पॅनेल जाहीर करा, असे सांगितल्यामुळे आम्ही आमचे पॅनेल जाहीर केले. तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर कोणताही परिणाम होईल, असे कृत्य शिवसेनेने करुन नये, असा इशारा हसन मुश्रीफ (Hasan MUshfiff) यांनी दिला आहे.

ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी अपेक्षा होती. मात्र शिवसेनेने एकदम स्वतंत्र पॅनेल जाहीर करत मुश्रीफ आणि सतेज पाटील यांना धक्का दिला आहे. शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री निवेदिता माने यांनीही सेनेच्या पॅनेलची साथ सोडत सत्ताधारी आघाडीच्या पॅनेलमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे महाडिक गटाने सत्ताधारी आघाडीशी जुळवून घेत अमल महाडिक यांना बिनविरोध संचालक केले.

Hasan Mushriff-Satej Patil

घाटगे आणि मुश्रीफ यांनी केली तडजोड : `शाहू` बिनविरोध, तर बॅंकेचाही तिढा सुटला...

केडीसीसी बॅंकेत महाविकास आघाडी म्हणून कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे पॅनेल असावे तसेच मित्र पक्षांनाही यामध्ये सोबत घेवून बॅंकेची निवडणूक बिनविरोध करावी, अशी चर्चा कालपासून सुरु होती. आजही सकाळी 10 पासून ते दुपारी तीन पर्यंत पाच तास चर्चा झाली. पण ही चर्चा निष्फळ ठरल्यानंतर सत्तारूढ पॅनेलच्यावतीने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी श्री मुश्रीफ बोलत होते.

श्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेला आम्ही सोडणार नाही. शिवसेना आमच्यासोबतच आहे. शिवसेनेला सोबत घेण्यासाठी शेवटपर्यंत सर्वांनीच प्रयत्न केला. अर्ज मागे घेण्यासाठी अर्धा तास राहिला आहे. यात शिवसेनेकडून तुमचे आम्ही पॅनेल तयार झाले आहे. तुमचे पॅनेल जाहीर करा, अशा आवाहन केले होते. जिल्हा बॅंकेत सहा ते आठ जण बिनविरोध होणार असेल तर जिल्ह्याच्या राजकारणावर फारसा परिणाम होईल. असे कृत्य करु नये अशी शिवसेनेला विनंती आहे. यामध्ये, उमेदवारी जाहीर केल्याशिवाय अर्ज मागे घेणारे अर्ज मागे घेणार नाहीत. त्यामुळे महिला गटात निवेदिता माने, भटक्‍या जाती गटात स्मिता युवराज गवळी (पाचगाव) व प्रक्रिया गटातून प्रदिप पाटील-भुयेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Hasan Mushriff-Satej Patil

हसन मुश्रीफ-सतेज पाटील यांचा सेनेला झटका! : भाजपला जवळ केले...

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ``जिल्हा बॅंक बिनविरोध करण्यासाठी शिवसेनेला सोबत घेण्याची भूमिका अर्ज मागे घेण्याच्या अर्धा तासापर्यंत घेतली होती. स्वीकृतसह दोन जागा देवून कोल्हापूर जिल्ह्यात बॅंकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे नियोजन केले होते. यावेळी, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे माजी खासदार निविदेता माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, माजी आमदार के.पी.पाटील उपस्थित होते.

Hasan Mushriff-Satej Patil

शिवसेना खासदाराच्या मातोश्रींनीही सोडली पक्षाची साथ

पी.एन, राजेश पाटील, ए. वाय. यांच्यासह अमल महाडिक बिनविरोध

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी विकास संस्था गटातून आमदार पी. एन. पाटील, राजेश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व माजी आमदार अमल महाडीक यांची बिनविरोध निवड झाली. या चारही तालुक्यातील अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने प्रत्येक तालुक्यात एकच अर्ज राहील्याने दोन आमदारांसह चौघांची बिनविरोध निवड झाली.

दरम्यान, माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी हातकणंगले तालुका विकास संस्था गटातून स्वतः माघार घेऊन मुलगा व माजी आमदार अमल महाडीक यांना संधी दिली. पतसंस्था गटात तिरंगी तर अन्य गटात दुरंगी लढतीचे चित्र आज अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी व चिन्हांचे वाटप उद्या (ता. २२) होणार आहे.

Hasan Mushriff-Satej Patil

धनंजय मुंडेंनी वरिष्ठांचा आदर ठेवला... जयंत पाटलांना स्वतः चहा आणून दिला...

या निवडणुकीसाठी संचालक पदाच्या २१ जागांसाठी तब्बल २७५ जणांचे अर्ज दाखल झाले होते. कालपर्यंत यापैकी २८ तर आज शेटवच्या दिवशी १६० अशा एकूण १८८ उमेदवारांनी आपआपल्या गटातून उमेदवारी अर्ज मागे घेतले. विकास संस्था गटातील सहा जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित १५ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात राहीले आहेत. या निवडणुकीसाठी ५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com