Solapur Bazar Samiti : भाजप आमदार विजयकुमार देशमुखांना धक्का; सोलापूर बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती

Vijaykumar Deshmukh : अशासकीय मंडळाच्या माध्यमातून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा आपले वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करणारे माजी पालकमंत्री तथा भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना धक्का बसला आहे.
Vijaykumar Deshmukh
Vijaykumar DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 16 July : अशासकीय मंडळाच्या माध्यमातून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा आपले वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करणारे माजी पालकमंत्री तथा भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना धक्का बसला आहे. पणन संचालकांनी बाजार समितीवर अशासकीय मंडळ नेमण्याऐवजी राज्याचे पणन उपसंचालक मोहन निंबाळकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे अशासकीय मंडळाच्या माध्यमातून मुलाच्या हाती बाजार समिती देण्याच्या विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नाला ‘खो’ बसला आहे.

राज्याचे पणन संचालक विकास रसाळ यांनी हा मोहन निंबाळकर यांच्या नियुक्तीचा आदेश काढला आहे. पुढील आदेश येईपर्यंत सोलापूर बाजार समितीचे (Solapur Bazar Samiti) प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू राहण्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती पणन (विकास आणि विनियमन) अधिनियम 1963 मधील कलम 15 (अ) च्या तरतुदीनुसार निंबाळकर यांच्या रुपाने प्रशासकाच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील आदेश येईपर्यत मोहन निंबाळकर हे सोलापूर बाजार समितीचे प्रशासक (Administrator) असतील, असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला देण्यात आलेली मुदतवाढ 15 जुलै रोजी संपली होती. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक लागणार की प्रशासकाच्या हाती बाजार समितीचा कारभार जाणार, अशी चर्चा होती. त्याचवेळी बाजार समितीवर अशासकीय मंडळाच्या माध्यमातून पुन्हा आपले वर्चस्व राहावे, यासाठी भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे प्रयत्न सुरू होते.

अशासकीय मंडळासाठी आमदार देशमुख यांनी त्यांचे चिरंजीव डॉ. किरण देशमुख, विक्रम देशमुख आणि शिवानंद पाटील यांच्या नावाची शिफारस केली होती पणन संचालकांनी आशासकीय सदस्यांचे मंडळ नेमण्याबाबत जिल्हा उपनिबंधकांकडून अभिप्राय आणि अशासकीय मंडळातील सदस्यांची माहिती मागून घेतली होती.

Solapur Bazar Samiti Administrator Order
Solapur Bazar Samiti Administrator OrderSarkarnama

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळास आतापर्यंत दोनवेळा मुदतवाढ देण्यात आले असून तिसऱ्या मुदतवाढीसाठीही सत्ताधारी भाजपचे आमदार देशमुख यांनी प्रयत्न केले होते. मात्र त्यांना तिसरी मुदतवाढ मिळू शकली नाही.

मुदतवाढ मिळत नसली तरी बाजार समितीवर वर्चस्व राखण्यासाठी बाजार समितीचे सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांचे वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू होते. अशासकीय मंडळात मुलासह आपल्याच कार्यकर्त्यांना संधी देताना त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी आणि दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, तसेच महायुतीमधील अजित पवार गट आणि शिंदे गटाचाही विचार केलेला नव्हता.

अशासकीय मंडळासाठी सत्ताधारी विजयकुमार देशमुख यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नाला खो बसला असून बाजार समितीवर पणन संचालकांनी पणन उपसंचालकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे बाजार समितीवर आपले वर्चस्व राखण्याच्या आमदार देशमुख यांच्या प्रयत्नाला धक्का बसला आहे.

Vijaykumar Deshmukh
Maratha Bhavan : पंढरपुरात उभारणार राज्यातील पहिले मराठा भवन; मुख्यमंत्री आषाढीला करणार भूमिपूजन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com