Padalkar : मध्यरात्री जेसीबीच्या साह्याने दुकाने - हॉटेल पाडली; गोपीचंद पडळकरांच्या भावावर गंभीर आरोप

Brahmanand Padalkar News : मिरज शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Gopichand Padalkar
Gopichand PadalkarSarkarnama
Published on
Updated on

Brahmanand Padalkar News : सांगली जिल्ह्यातील मिरज शहरातील काही दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आले आहे. यामुळे येथे दोन गटात राडा झाल्याची घटना घडली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकरांनी हे अतिक्रमण बेकायदेशीरपणे जागेचा ताबा घेण्याच्या उद्देशाने पाडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

मिरज शहरातील दुकाने आणि हॉटेल मध्यरात्री जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र ही कारवाई मध्यरात्री का करण्यात आली? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. हे अतिक्रमण हटवण्याला स्थानिकांनी विरोध केला असून ब्रह्मानंद पडळकर यांच्या विरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत.

Gopichand Padalkar
Girish Mahajan News : 'मार्ड'च्या डॉक्टरांसाठी गुड न्यूज ; निवासी डॉक्टरांची तब्बल एवढी पदे भरणार

मिरज शहरातील एसटी स्टॅन्डजवळ हे पाडकाम करण्यात आलं. यामध्ये दोन हॉटेल, एक मेडिकल स्टोर, ट्रॅव्हल, ऑफिस, एक घर, पान शॉप अशा सात मिळकती पाडण्यात आल्या आहेत. तर हजार लोकांच्या साह्यायाने येथील जागेचा ताबा घेण्यासाठी पडळकर आले असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

Gopichand Padalkar
Fadanvis यांनी दिली होती ग्वाही, त्यानंतरही वीज वितरण फ्रेन्चायझीकडे देण्याचा घाट?

ब्राह्मनंद पडळकर यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे चुकीचे असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ब्राह्मनंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आता स्थानिक नागरिक करत आहेत.

दरम्यान, मिरज शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ब्रह्मानंद पडळकर हे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com