Karad NCP News : उंब्रजच्या पारदर्शक उड्डाणपुलासाठी श्रीनिवास पाटलांचे मंत्री गडकरींना साकडे; दुसऱ्यांदा घेतली दिल्लीत भेट

MP Shrinivas Patil उंब्रज येथे नवीन उड्डाणपूल होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकार या कामासाठी सकारात्मक आहे, असे श्रीनिवास पाटील यांनी म्हटले आहे.
MP Shrinivas Patil, Nitin Gadkari
MP Shrinivas Patil, Nitin Gadkarisarkarnama
Published on
Updated on

Karad NCP News : शेंद्रे ते कागल राष्ट्रीय महामार्गावरील कऱ्हाड तालुक्यातील उंब्रज येथे नवा पारदर्शक उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. तेथे सुरू असलेल्या महामार्गाच्या सहापदरीकरण कामात त्या उड्डाणपुलाचा समावेश करावा. त्याचे काम त्वरित हाती घ्यावे, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. दिल्ली येथे खासदार पाटील यांनी मंत्री गडकरी यांची भेट घेतली. या वेळी सातारा लोकसभा मतदारसंघातील अन्य प्रलंबित कामासंदर्भात चर्चा झाली.

उंब्रजच्या ग्रामस्थांनी खासदार श्रीनिवास पाटील Srinivas Patil यांची भेट घेऊन तेथे पारदर्शक उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी केली होती. त्यामुळे खासदार पाटील यांनी केंद्रीय पातळीवर त्याचा पाठपुरावा केला होता. त्यानुसार सर्व्हे करून तांत्रिक बाबी तपासल्या जात असल्याचे मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी खासदार पाटील यांना कळवले होते.

त्याच्या पुढील कार्यवाहीसाठी खासदार पाटील यांनी पुन्हा एकदा मंत्री गडकरी यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी मागणी केली. खासदार पाटील म्हणाले, ‘‘महामार्ग क्रमांक चार या राष्ट्रीय महामार्गावरील उंब्रज जवळपास ४० गावांसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. त्याची लोकसंख्या सुमारे २५ हजार आहे.

तेथे बँकांसहित शासकीय आणि खासगी कार्यालये आहेत. पोलिस ठाणे, पोस्ट ऑफिस, टेलिफोन एक्स्चेंज, एमएसईबी, सिटी सर्व्हे, सब रजिस्ट्रार, कृषी, धोम पाटबंधारे विभाग आदींची कार्यालये आहेत. महाविद्यालय, शाळा आणि हॉस्पिटलही आहेत. उंब्रजचा झपाट्याने विकास व विस्तार होत आहे.

त्या गावातून राष्ट्रीय महामार्ग जात असल्यामुळे त्याची दोन भागांत विभागणी होत आहे. वास्तविक चिपळूण ते पंढरपूर राज्य महामार्गही उंब्रज येथून जातो. तो राष्ट्रीय महामार्गाला ओलांडून पलीकडे जातो. त्यामुळे उंब्रज रहदारीचे आणि अपघाताचे ठिकाण आहे.

त्या महामार्गावर फक्त एक अंडरपास भरीव उड्डाणपूल आहे. तो अत्यंत अपुरा आहे. पावसाळ्यात अंडरपासमध्ये पाणी साचते.’’ उंब्रज येथे योग्य नकाशानुसार केलेला उड्डाणपूल बांधण्यासाठी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना द्याव्यात आणि सध्या सुरू असलेल्या कामात पारदर्शक पुलाचा समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली. याचे निवेदनही खासदार पाटील यांनी मंत्री गडकरी यांना दिले.

Edited By Umesh Bambare

MP Shrinivas Patil, Nitin Gadkari
Karad Congress News : जातनिहाय जनगणनेचा काँग्रेसचा आग्रह; पण हे मोदींना मान्य नाही...पृथ्वीराज चव्हाण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com