Karad Congress News : जातनिहाय जनगणनेचा काँग्रेसचा आग्रह; पण हे मोदींना मान्य नाही...पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan कराड तालुक्यातील कार्वे येथे राज्यस्तरीय माळी महासंघाचे संस्थापक - अध्यक्ष शिवाजीराव माळी यांच्या तैलचित्र अनावरण कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.
Prithviraj Chavan, Narendra Modi
Prithviraj Chavan, Narendra Modisarkarnama
Published on
Updated on

Karad Prithviraj Chavan News : एखाद्या समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होऊ नये, ही माझी भूमिका आहे. जातीच्या आधारावर जनगणना झाल्यास त्यातून प्रत्येक समाजाला न्याय मिळेल. जातवार जनगणना झाली पाहिजे व वास्तव पुढे आले पाहिजे, असा काँग्रेसचा आग्रह आहे, पण हे मोदींना मान्य नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

कार्वे येथे राज्यस्तरीय माळी महासंघाचे Mali Mahasangh संस्थापक - अध्यक्ष शिवाजीराव माळी यांच्या तैलचित्र अनावरण कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan बोलत होते. या वेळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, कोयना सहकारी दूध संघाचे माजी उपाध्यक्ष बाबूराव धोकटे, युवा नेते इंद्रजित चव्हाण, जयेश मोहिते, संजय तडाखे, तसेच माळी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शिवाजीराव माळी यांनी असंघटित व विस्कळीत समाजाला एकत्र आणून वेगळी ओळख करून देण्याचे कम केले. कुठेही आक्रोश, आवाज न करता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून संघटन केले. कामाची कोणतीही मर्यादा न ठेवता वेगळी भूमिका घेऊन हा संघ पुढे निघाला आहे.

चव्हाण म्हणाले, एखाद्याला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होऊ नये, ही माझी भूमिका आहे. जातीच्या आधारावर जनगणना व्हावी. त्यातून प्रत्येक समाजाला न्याय मिळेल. जातवार जनगणना झाली पाहिजे व वास्तव पुढे आले पाहिजे, असा काँग्रेसचा आग्रह आहे. पण हे मोदींना मान्य नाही.

चव्हाण म्हणाले, आरक्षण देताना मूलभूत विचार करण्याची गरज आहे. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दुसऱ्या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता १६ टक्के आरक्षण दिले. मराठा समाजातील भूमिहीन, अल्पभूधारक लोकांना समोर ठेवून जुलै २०१४ मध्ये हे आरक्षण दिले. त्याचबरोबर मुस्लिम समाजाला चार टक्के आरक्षण दिले. पण या आरक्षणाला त्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी डावलले.

Edited By Umesh Bambare

Prithviraj Chavan, Narendra Modi
Pusesavali News : अखेर पालकमंत्री देसाई पोहाेचले पुसेसावळीत; म्हणाले, निर्दोष व्यक्तींवर कारवाई होणार नाही...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com