किरीट सोमय्या हा फालतू कार्यकर्ता : श्रीरंग बारणेंचा हल्लाबोल

भाजप हा सत्तापिपासू पक्ष असून भाजपचे नेते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, त्यामुळंच खालच्या थराला जाऊन भाजपचे नेते अशी टीका करतात.
Uddhay Thackeray-Shrirang Barne-Kirit Somaiya
Uddhay Thackeray-Shrirang Barne-Kirit SomaiyaSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : किरीट सोमय्या हा फालतू कार्यकर्ता आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी भाजपचे माजी खासदार सोमय्या यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना सोमय्या यांची जीभ घसरली होती, अगदी त्याच भाषेत बारणे यांनी सोमय्यांना प्रत्युत्तर दिले आहे. (Shrirang Barne replied to Kirit Somaiya who criticized the Chief Minister)

Uddhay Thackeray-Shrirang Barne-Kirit Somaiya
'संभाजीराजेंनी ती ऑफर स्वीकारली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती...'

परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सक्तवसुली संचनालयाने छापे टाकल्यानंतर माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी परब यांच्यासह मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. बारणे हे आज एक दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार बारणे यांनी वरील भाषा वापरली.

Uddhay Thackeray-Shrirang Barne-Kirit Somaiya
काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवाराबाबत बाळासाहेब थोरात म्हणाले....

खासदार बारणे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जेव्हापासून महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेत आलं आहे, तेव्हापासून भारतीय जनता पक्ष हे सरकार लवकरच पडेल, असं सातत्याने सांगत आलं आहे. भाजप हा सत्तापिपासू पक्ष असून भाजपचे नेते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, त्यामुळंच खालच्या थराला जाऊन भाजपचे नेते अशी टीका करतात.

Uddhay Thackeray-Shrirang Barne-Kirit Somaiya
संभाजीराजेंच्या पाठिंब्याबाबत थोरातांचा मोठा गौप्यस्फोट; 'मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती...'

माजी खासदार किरीट सोमय्या हे फालतू कार्यकर्ते आहेत, ते जी टीका करतात, ते पटण्यासारखं नाही आहे, असं म्हणत मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार तोफ डागली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com