Silver Oak Attack : मराठा क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेड आक्रमक : वळसे पाटलांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबईमध्ये ही घटना घडत असताना पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचारी काय करत होते? असा प्रश्न उपस्थित करत भाजपने या हल्ल्याचा कट रचला आहे, असा आरोपही केला जात आहे.
Silver Oak Attack
Silver Oak AttackSarkarnama

पंढरपूर : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. पंढरपुरात ही आज (ता. ९ एप्रिल) या घटनेचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. या वेळी मराठा क्रांती मोर्चा व संभाजी ब्रिगेडच्या वतीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‌(Silver Oak Attack : Maratha Kranti Morcha, Sambhaji Brigade demands resignation of Home Minister walse Patil)

पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि सामाजिक संघटनांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ॲड. सदावर्ते आणि भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करत भ्याड हल्ल्याचा निषेध केला.

Silver Oak Attack
गृह विभागाच्या अपयशाची चर्चा अन् मुख्यमंत्री ठाकरे 'अॅक्शन मोड'वर; पोलीस आयुक्त थेट 'वर्षा'वर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पवारांवरील हल्याच्या घटनेवरून पोलिस आणि गृहविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी‌ गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

Silver Oak Attack
Silver Oak Attack : शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे ‘रेशीम बागे’ची शक्ती : उमेश पाटील

रामभाऊ गायकवाड म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग आहे. या घटनेला पोलिस जबाबदार असून गृहमंत्री दिलीप‌ वळसे पाटील यांनी‌ तत्काळ राजीनामा द्यावा. गृहमंत्रीपद सक्षम व्यक्तीकडे द्यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी केली आहे.

Silver Oak Attack
'माझी हत्या होऊ शकते' : पोलिसांनी ताब्यात घेताच सदावर्तेंचा वळसे-पाटलांवर गंभीर आरोप

मुंबईमध्ये ही घटना घडत असताना पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचारी काय करत होते? असा प्रश्न उपस्थित करत भाजपने या हल्ल्याचा कट रचला आहे, असा आरोपही केला जात आहे. या हल्ल्यामागचा खरा सूत्रधार कोण आहे, हे पोलिसांनी तात्काळ शोधून काढून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी व्यापार आणि उद्योग विभागाचे प्रदेश‌ अध्यक्ष नागेश‌ फाटे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com