Silver Oak Attack : शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे ‘रेशीम बागे’ची शक्ती : उमेश पाटील

महाराष्ट्रात ईडीचा कट अपयशी ठरल्यानंतर आता मिटलेल्या एसटी आंदोलनातून शरद पवार यांना बदनाम केले जात आहे. या सर्वांचे परिणाम आगामी काळात दिसतील.
Silver Oak Attack-Umesh Patil
Silver Oak Attack-Umesh PatilSarkarnama

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा झालेला विषय आता चांगलाच गाजू लागला आहे. या आंदोलनात दिसणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी नागपूरमधील ‘रेशीम बागे’ची शक्ती असल्याचा आरोप पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील (Umesh Patil) यांनी केला आहे. (Power of 'Reshim Bag' behind the attack on Sharad Pawar's house : Umesh Patil)

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांना काय मिळाले? हा प्रश्न सध्या कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय आहे. त्यातच एसटी कर्मचाऱ्यांचे वकिल ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांची नवी भूमिका अनेक कर्मचाऱ्यांना खटकू लागली आहे. लालपरी पुन्हा ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद वाक्य घेऊन धावणार असल्याचा आशावाद दिसत होता. पण, आजच्या आंदोलनामुळे त्याबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Silver Oak Attack-Umesh Patil
Silver Oak Attack : ॲड. सदावर्ते यांना दीड तासाच्या चौकशीनंतर अटक; ‘ही’ लावली कलमे!

प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना बदनाम करण्याचा मोठा कट सातत्याने रचला जात आहे. पवार यांच्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे. महाराष्ट्रात ईडीचा कट अपयशी ठरल्यानंतर आता मिटलेल्या एसटी आंदोलनातून शरद पवार यांना बदनाम केले जात आहे. या सर्वांचे परिणाम आगामी काळात दिसतील, असा इशाराही पाटील यांनी या वेळी दिला आहे.

Silver Oak Attack-Umesh Patil
'माझी हत्या होऊ शकते' : पोलिसांनी ताब्यात घेताच सदावर्तेंचा वळसे-पाटलांवर गंभीर आरोप

दरम्यान, ‘सिल्व्हर ओक’ हल्ल्याप्रकरणी एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांचे वकिल ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना दीड तासाच्या चौकशीनंतर मुंबईच्या गावदेवी पोलिसांकडून शुक्रवारी (ता. ८ एप्रिल) रात्री दहाच्या सुमारास अटक करण्यात आली. इतर १०५ एसटी कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्याची कार्यवाही सुरू आहे, त्यामुळे उद्या शनिवारी (ता. ९ एप्रिल) त्यांच्यासह १०६ जणांना न्यायालयात उभे करण्यात येणार आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com