नगरमधील शिवसेनेला खिंडार : जिल्हा प्रमुखाच्या चिरंजिवासह सहा नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला

अहमदनगर शहरातील काही आजी, माजी नगरसेवक आज पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले.
Eknath Shinde, Anil Shinde, Dilip Satpute
Eknath Shinde, Anil Shinde, Dilip SatputeSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना पदाधिकारी व नेत्यांची संख्या वाढत आहे. अशातच अहमदनगर शहरातील काही आजी, माजी नगरसेवक आज पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले. या मध्ये शिवसेनेचे अहमदनगर दक्षिण जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांचे चिरंजिव नगरसेवक योगीराज गाडे, बंधू रमाकांत गाडे यांचाही समावेश आहे. त्यामुळे अहमदनगर शहरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. ( Six corporators, including son of the district head, along with former corporators are at the throat of the Shinde group. )

अहमदनगर शहरातील शिवसेनेत मागील दीड वर्षांपासून दोन गट स्पष्ट दिसत आहेत. यातच नगरसेवक अनिल शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे समर्थक मानले जातात. अनिल शिंदे यांच्या पत्नी शीला शिंदे या अहमदनगरच्या माजी महापौर राहिल्या आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर अनिल शिंदे यांनी पेढे वाटत आनंद व्यक्त केला होता.

गुरूपौर्णिमेच्या दिवसी अनिल शिंदे हे नगरसेवक सचिन जाधव व अनिल लोखंडे यांच्यासह एकनाथ शिंदे यांना भेटून आले होते. मागील महिन्यात शशिकांत गाडे यांनी शिवसेनेचा मेळावा घेतला. या मेळाव्याला अनिल शिंदे व काही नगरसेवक अनुपस्थित होते. काल (मंगळवारी) शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी घेतलेल्या मेळाव्यातही काही नगरसेवक अनुपस्थित होते. आज सायंकाळी शिवसेनेचे सहा नगरसेवक, काही माजी नगरसेवक व शिवसैनिक एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले.

Eknath Shinde, Anil Shinde, Dilip Satpute
नगरमधील शिवसेना नगरसेवकाला जिवे मारण्याची धमकी

एकनाथ शिंदे यांनी भेट घेण्यासाठी गेलेल्यांत नगरसेवकांत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांचे यांचे बंधू रमाकांत गाडे, नगरसेवक अनिल शिंदे, योगीराज गाडे, सचिन जाधव, मदन आढाव, सुभाष लोंढे, सुभाष लोंढे, माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी नगरसेवक अनिल लोखंडे, चंद्रकांत (काका) शेळके, अक्षय कानवणे, प्रकाश फुलारी,संग्राम शेळके, अभिषेक भोसले आदींचा यात समावेश आहे. भेटीसाठी गेलेल्या शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यांसाठी निधीच्या मागणीचे निवेदन एकनाथ शिंदे यांना दिले. तसेच चर्चा ही केली.

अहमदनगर महापालिकेत शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे या महापौर आहेत. त्याच शिवसेनेच्या गटनेत्याही आहेत. शिवसेनेचा स्वतंत्र गट तयार करण्यासाठी आणखीही काही नगरसेवक या गटाला आवश्यक ठरणार आहेत. त्यामुळे शिंदे गटात आणखी किती नगरसेवक येतात यावर या गटाचे भवितव्य ठरणार आहे. मात्र नगरमधील शिवसेनेला खिंडार पडले हे मात्र आता स्पष्ट झाले आहे.

Eknath Shinde, Anil Shinde, Dilip Satpute
नगरचे शिवसेना नगरसेवक गेले मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला : म्हणाले हेच आमचे गुरू

काँग्रेसचा माजी नगरसेवकही शिंदेच्या भेटीला

काँग्रेसचे माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनीही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांना एक चित्रही भेट दिले. धनंजय जाधव हे भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात. धनंजय जाधव यांच्या पत्नी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com