NCP SP Politic's : थेट नगराध्यक्षपदासाठी मंगळेवढ्यात सहाजण फुंकणार तुतारी; ‘ऐनवेळी पक्षात येणाऱ्यांना उमेदवारी देऊ नका’

Mangalvedha Nagar Palika Election : मंगळवेढा नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सहा इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली असून, निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यावे, असा सूर पक्षाच्या बैठकीतून उमटला.
NCP SP Meeting
NCP SP MeetingSarkarnama
Published on
Updated on
  1. मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत सहा जणांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारीची मागणी केली.

  2. बैठकीत कार्यकर्त्यांनी स्पष्ट मागणी केली की पक्षाशी निष्ठावंत, जुने कार्यकर्ते यांनाच उमेदवारी द्यावी, नव्याने आलेल्यांना प्राधान्य देऊ नये.

  3. महाविकास आघाडीमार्फत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात येईल, मात्र स्थानिक स्तरावर पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर देण्यात आला.

Mangalvedha, 25 October : मंगळवेढा नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठीच्या इच्छुक कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आज (ता. २५ ऑक्टोबर) बैठक घेण्यात आली. या बैठकीत थेट नगराध्यक्षपदासाठी सहा जणांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी देताना पक्षासाठी जीवाचे रान केलेल्या कार्यकर्त्याला संधी द्यावी. उमेदवारीसाठी ऐनवेळी पक्षात आलेल्यांचा विचार करू नये, असा सूर या बैठकीतून निघाला.

पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डाॅ. लक्ष्मण ढोबळे, जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, तालुकाध्यक्ष पांडुरंग चौगुले, शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) नेते अनिल सावंत आदी या वेळी मंचावर होते. बैठकीस मंगळवेढा शहरातील कार्यकर्ते, पदाधिकारी व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनिल सावंत (Anil Sawant) म्हणाले, ‘नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. माझ्या निवडणुकीत झटलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, ही माझी जबाबदारी आहे. मी माझी संपूर्ण ताकद निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी लावणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख म्हणाले, वरिष्ठांच्या आदेशानुसार येणाऱ्या सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवायच्या आहेत. परंतु आपला पक्ष म्हणून प्रथम आपली तयारी करणे आवश्यक असून आपल्या पक्षातील इच्छुक उमेदवाराचे मत विचारात घेऊन निर्णय घ्यायचा आहे, त्यामुळे प्रत्येकाने एकदिलाने काम करून पक्षाच्या उमेदवारांना विजयी करणे हीच आपली प्राथमिकता असायला हवी.

NCP SP Meeting
Karad Politic's : प्रतिष्ठा पणाला लागणार पृथ्वीराजबाबा-अतुल भोसलेंची; पण उदयसिंह उंडाळकर, मनोहर शिंदे ठरणार किंगमेकर

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे म्हणाले, चांगली माणसं सभागृहात गेली पाहिजे, फक्त निविदावर भांडून नगरपालिका मोडीत काढण्यापेक्षा नगरपालिकेची प्रतिष्ठा राखून चांगल्या पद्धतीने (स्व.) रतनचंद शहा शेठजी आणि (स्व) कि. रा. मर्दा ऊर्फ मारवाडी वकील यांचे सात्विक रूप कायम ठेवू.

तालुकाध्यक्ष पांडुरंग चौगुले यांनी तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी देशातील शेतकऱ्यांसाठी 72 हजार कोटीची कर्जमाफी केली होती. मात्र, हे सरकार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईचे पैसे देऊ म्हणणारे दिवाळी सणालादेखील पैसे देऊ शकले नाहीत.

शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वातावरण असून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम केल्यास नगरपालिकेवर आपली सत्ता पुन्हा कायम राहील, अशा आशावाद प्रास्ताविकात केला. राजाभाऊ चेळेकर यांनी आभार मानले.

NCP SP Meeting
Satara Congress : काँग्रेसने जिल्हाध्यक्ष बदलूनही सूर जुळेना..., माजी मुख्यमंत्र्यांसोबत काम केलेल्या बड्या नेत्याचा रामराम

Q1. मंगळवेढा नगरपालिकेच्या बैठकीत किती जणांनी नगराध्यक्षपदासाठी मागणी केली?
A1. सहा जणांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारीची मागणी केली.

Q2. बैठकीत कार्यकर्त्यांनी कोणती मुख्य मागणी केली?
A2. पक्षाशी निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांनाच संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

Q3. आगामी निवडणुका कोणत्या आघाडीमार्फत लढवल्या जाणार आहेत?
A3. महाविकास आघाडीमार्फत निवडणुका लढवल्या जाणार आहेत.

Q4. शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी यांनी काय सांगितले?
A4. त्यांनी सांगितले की सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण असून राष्ट्रवादीने एकजुटीने काम केल्यास सत्ता पुन्हा मिळेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com