Madha Politic's : सावंत कुटुंबात वाद पेटला; ‘कोण अनिल सावंत?, मी त्याला मानत नाही’, शिवाजी सावंतांचा पुतण्यावर हल्लाबोल

Assembly Election 2024 : कोण अनिल सावंत?. तो पंढरपूर मतदारसंघात उभा आहे ना, त्याचा माढ्याशी काय संबंध आहे. माझा पक्ष वेगळा, त्याचा पक्ष वेगळा. त्या पक्षाला मतं मागण्यासाठी माझा उपयोग करायचा असेल तर काय संबंध आहे.
Shivaji Sawant-Anil Sawant
Shivaji Sawant-Anil Sawant Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 14 November : माढ्याच्या सावंत कुटुंबीयांत चांगलाच वाद पेटला असून पुतण्या अनिल सावंतांनी ‘सावंत परिवारा’त एकटं ठरविण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांचे काका शिवाजी सावंत यांनीही पुतण्याच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. शिवाजी सावंतांनी पंढरपूर मंगळेवढा मतदारसंघात चक्क पुतण्याच्या विरोधात समाधान आवताडेंना पाठिंबा दिला असून सावंत परिवाराचे राजकारण ज्यांनी उभा केलं, त्यांना जर ते मानत नसतील तर कोण अनिल सावंत?, असा सवाल विचारला आहे, त्यामुळे माढ्याच्या पाठिंब्यावरून सावंत परिवारात उभी फूट पडली आहे.

पंढरपूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत (Anil Sawant) यांनी गुरुवारी (ता. 14 नोव्हेंबर) रात्री पत्रकार परिषद घेत शिवाजी सावंतांचा माढ्यात रणजितसिंह शिंदे यांना दिलेला निर्णय वैयक्तिक असल्याचे म्हटले होते. त्याला शिवाजी सावंतांनी आज माढ्यात पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.

ते म्हणाले, अनिल सावंतांनी पंढरपुरात पत्रकार परिषद घेऊन माढ्यात (Madha) अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे यांना दिलेला शिवाजी सावंत यांचा निर्णय वैयक्तिक आहे. सावंत परिवार हा शिवाजी सावंत यांच्यासोबत नाही, असे म्हटले होते, त्यामुळे सावंत परिवार हा अनिल सावंत यांच्यासोबत असल्यामुळे शिवाजी सावंत (Shivaji Sawant) एकटे पडले आहेत, असे चित्र उभे करण्यात आले.

अनिल सावंत यांनी पाहुणे रावळे बोलावून पत्रकार परिषद घेतली हेाती. सावंत परिवार म्हणजे त्यांचे व्याही, जावई आणि मेहुणे हे कोणी नसून सावंत परिवाराचे मूळ म्हणजे शिवाजी सावंतांचे राजकीय फाउंडेशन १९९२ पासून आहे. सावंतांच्या राजकारणाची सुरुवात मी एकट्याने केली आहे. माझे राजकारण कोणत्याही पाव्हण्या रावळ्याच्या जिवावर नाही. सावंत परिवार काय आहे, हे त्यांनी आम्हाला सांगायची गरज नाही, असा टोला त्यांनी अनिल सावंतांना लगावला.

Shivaji Sawant-Anil Sawant
Sawant family Dispute : सावंत कुटुंबीय फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिलीय; शिवाजी सावंतांचा घणाघाती आरोप

शिवाजी सावंत म्हणाले, नातेसंबंध जुळल्यानंतरचे ते पाहुणे आहेत. राजकारणाची सुरुवात त्यांनी कोणी आमच्या खांद्याला खांदा लावून केलेली नाही. काम आहे, आपल्याला चर्चा करायाची आहे, म्हणून अनिल सावंतांनी पाहुणे रावळे पंढरपुरात बोलावले होते.

महाराष्ट्रात सावंत घराणे राजकारणात सर्वांत मोठे घराणे असून ते ताकदीने उभे आहे. ते फोडण्यासाठी अकलूजच्या मोहिते पाटलांनी राम बसके आणि श्रीमंत कोकाटे यांना सुपारी दिली आहे. त्यांनी दोघांनी कटकारस्थान करून पंढरपुरात पत्रकार परिषद घेतली.

शिवाजी सावंत एकटा आहे, असे त्यांना वाटत असेल तर मी माढा, पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस तालुक्यातील माझ्याबरोबर पहिल्यापासून काम करीत असलेल्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की तुम्ही पंढरपूर-मंगळवेढ्यातील महायुतीच्या उमेदवाचे काम करावे. माढ्यातील कार्यकर्त्यांनी रणजितसिंह शिंदेना निवडून आणायचे आहे, असे आवाहन सावंत यांनी केले.

मी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निर्णय घेतला आहे, तो वैयक्तिक कसा असू शकतो. आजसुद्धा माझे सर्व कार्यकर्ते आणि पाहुणे रावळे आमच्यासोबत आहेत. त्यांना पंढरपुरात झालेला निर्णय मान्य नाही. ते जर आपल्याला एकटे समजत असतील तर आपण रणजित शिंदे यांना निवडून आणू, असा कार्यकर्त्यांनी निर्धार केला आहे, असे सावंतांनी नमूद केले.

मी माझी पक्षनिष्ठा का सोडू?

शिवाजी सावंत म्हणाले, सावंत परिवाराचे राजकारण ज्यांनी उभं केलं, त्यांना जर ते मानत नसतील तर कोण अनिल सावंत?. तो पंढरपूर मतदारसंघात उभा आहे ना, त्याचा माढ्याशी काय संबंध आहे. माझा पक्ष वेगळा, त्याचा पक्ष वेगळा. त्या पक्षाला मतं मागण्यासाठी माझा उपयोग करायचा असेल तर काय संबंध आहे. मी आज शिवसेनेचा संपर्कप्रमुख आहे आणि ते जर मला असं करा, असे सांगत असतील तर मी ऐकणार नाही. मी माझी पक्षनिष्ठा का सोडू?

Shivaji Sawant-Anil Sawant
ShahajiBapu Patil : शहाजीबापूंचा देशमुख, साळुंखेंवर हल्लाबोल; ‘गणपतराव देशमुखांना मी संपलो नाही, तुम्ही तर कालची लेकरं..’

सावंत घरात फूट पाडण्यासाठी काहींची बिभिषणाची भूमिका

माझ्या राजकारणावर त्याला वाटत असेल की माझा वैयक्तिक निर्णय आहे तर कोण अनिल सावंत. मी त्याला मानत नाही. बाहेरची लोक येऊन आमच्या घरात फूट पाडण्यासाठी बिभीषणाची भूमिका बजावत आहेत. जवळचे पाहुणे रावळेच घरात फूट पडायला लागेल आहेत, त्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे. आज त्यांच्यासोबत पैशामुळे गर्दी गोळा झाली आहे. ते उद्याच्या निकालानंतर त्यांच्यासोबत दिसणारही नाहीत. सावंत कुटुंबात फूट पाडून त्याची राजकीय ताकद कमी झाली पाहिजे, असा काही वरिष्ठ लोकांचा हेतू आहे. हे आमच्या घरातील लोकांना कळलं पाहिजे, असा टोलाही शिवाजी सावंतांनी अनिल सावंतांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com