

Solapur, 14 September : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाकडून वेगवान हालचाली होत आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील आमदार-माजी आमदारांसह प्रमुख नेतेमंडळींची नुकतीच एक बैठक सोलापुरात झाली. दुसरीकडे, बॅंकेच्या निवडणुकीसाठी एकूण २ हजार १६५ संस्थांचे ठराव झाले आहेत. त्या ठरावांची सध्या तपासणी सुरू असून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या अक्कलकोट तालुक्यातील सहा ठराव रद्द होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संबंधित नेत्याला सहा मतांचा फटका बसू शकतो.
सोलापुरात झालेल्या बैठकीत सोसायटी मतदारसंघातील ११ जागांवर तोडगा निघाला आहे. त्या त्या तालुक्यातील नेत्याला ती जागा सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. मात्र, इतर आठ जागांचे वाटप हे माघारीच्या आदल्या दिवशी घेण्याचे ठरले आहे. पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे यांसदर्भात बैठक होणार आहे, त्यावर जागा वाटपाचा अंतिम निर्णय होणार आहे.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी मतदार प्रतिनिधींचे झालेले जिल्ह्यातील २ हजार १६५ संस्थांचे ठराव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत. या ठरावांची तपासणी सध्या सुरू आहे. आता हे ठराव सहनिबंधकांकडे प्रारुप मतदारयादीसाठी पाठविण्यात येणार असून आक्षेप आणि हरकतीनंतर प्रारूप मतदारयादी जाहीर होणार आहे.
दरम्यान, अक्कलकोट तालुक्यातील सहा सभासद संस्थांचे ठराव दाखल झाले आहेत. परंतु या संस्था २०२३ नंतर जिल्हा बँकेच्या सभासद झाल्याने अहर्ता तारखेच्या निकषात या संस्था बसत नाहीत. त्यामुळे या संस्थांचे ठराव रद्द होण्याची शक्यता आहे. डीसीसीच्या निवडणुकीत २१५९ किंवा त्यापेक्षा कमी मतदार अंतिम यादीत येऊ शकतात.
सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांची किती ताकद
अक्कलकोट : १३१ (सोसायटी : ८९, पणन प्रक्रिया : १, दुग्ध संस्था : ०, बँका व पतसंस्था : ४१)
बार्शी : २०९ (सोसायटी : १३५, पणन प्रक्रिया : १२, दुग्ध संस्था : ७, बँका व पतसंस्था : ५५)
करमाळा : १४५ (सोसायटी : ११३, पणन प्रक्रिया : ५, दुग्ध संस्था : ४, बँका व पतसंस्था : २३)
माळशिरस : ३१३ (सोसायटी : १४१, पणन प्रक्रिया : १९, दुग्ध संस्था : ५९, बँका व पतसंस्था : ९४)
माढा : ३१८ (सोसायटी : १७५, पणन प्रक्रिया : १८, दुग्ध संस्था : ७५, बँका व पतसंस्था : ५०)
मंगळवेढा : ११७ (सोसायटी : ६२, पणन प्रक्रिया : ८, दुग्ध संस्था : ५, बँका व पतसंस्था : ४२)
मोहोळ : १७८ (सोसायटी : १२०, पणन प्रक्रिया : ४, दुग्ध संस्था : १०, बँका व पतसंस्था : ४४)
पंढरपूर : २४३ (सोसायटी : १८१, पणन प्रक्रिया : ६, दुग्ध संस्था : १२, बँका व पतसंस्था : ४४)
सांगोला : १७२ (सोसायटी : ७९, पणन प्रक्रिया : ९, दुग्ध संस्था : ३१, बँका व पतसंस्था : ५३)
उत्तर सोलापूर : २३४ (सोसायटी : ६६, पणन प्रक्रिया : २, दुग्ध संस्था : २, बँका व पतसंस्था : १६६)
दक्षिण सोलापूर : ९९ (सोसायटी : ८२, पणन प्रक्रिया : २, दुग्ध संस्था : १, बँका व पतसंस्था : १४)
एकूण : २१५९ (सोसायटी : १२४३, पणन प्रक्रिया : ८६, दुग्ध संस्था : २०४, बँका व पतसंस्था : ६२६)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.