Satara Politics : जनतेचे प्रेम होते तर लोकसभेला पडलात कसे? शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना डिवचलं..

खासदार उदयनराजे भोसले यांच्या पेंटिंगवरून राजे समर्थक आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यामध्ये गैरसमजातुन वाद निर्माण झाला होता.
Satara Politics
Satara Politics Sarkarnama

Satara Politics :  साताऱ्यात खासदारांच्या पेंटिंगवरून निर्माण झालेला वाद हा बालिशपणाचे लक्षण आहे. पेंटिंग त्रयस्थांनी काढले असते तर समजणे शक्य होते. पण त्यांच्याच बगलबच्चांनी पेंटिंग काढायचे आणि लोकांचे माझ्यावर किती प्रेम आहे, असा आपणच उदो उदो करायचा हे काही खरे नाही. एवढे जर जनतेचे प्रेम असतेतर लोकसभेला पडला कसे, याचे आत्मचिंतन करावे, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंना लगावला. (so how did you lose the Lok Sabha elections? Shivendra Raj's criticism of Udayan Raj)

खासदार उदयनराजे भोसले यांच्या पेंटिंगवरून राजे समर्थक आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यामध्ये गैरसमजातुन वाद निर्माण झाला होता. उदयनराजेंनी हा वाद नव्हता केवळ गैरसमज झाला होता असे सांगुन आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना तुम्हीही लोकांची कामे करा लोक तुमचेही पेंटिंग काढतील असा सल्ला दिला होता. त्याला आज शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रतिउत्तर दिले.

Satara Politics
Palkhi Marg news: गडकरींकडून वारकऱ्यांना नव्या वर्षात मोठी भेट: पालखी मार्गाचे होणार उद्‌घाटन

शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वेळीच आवरायला हवे प्रशासनावर त्यांची दैनंदिन कामे सोडून कायदा सुव्यवस्थेवर लक्ष द्यावे लागेल असे  असे कोणतेही कृत्यकरू नये. खासदारांचे पेंटिंग एखाद्या त्रयस्त व्यक्ती किंवा यंत्रणेमार्फत काढले गेले असते तर ते समजू शकलो असतो. मात्र खासदाराच्याच गाडीत बसणाऱ्या बगलबच्चांनी त्यांची पेंटिंग काढायचे आणि मी कसा लोकप्रिय आहे याचा त्यांनी उदो उदो करायचा हे न समजण्याच्या पलीकडे आहे.

लोकप्रियता जर इतकी होती तर लोकसभेत पराभव का झाला याचे आत्मचिंतन होणे गरजेचे आहे. लोकांच्या विकास कामांना महत्त्व देणे अतिशय गरजेचे आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, कोणी माझे पेंटिंग काढावे यामध्ये मला रस नाही.मला माझ्या मतदारसंघांमध्ये लोकांसाठी केलेल्या कामाची पूर्तता करणे यामध्ये रस आहे. त्यामुळे या मतदारसंघातून बहुतांश वेळा मला प्रतिनिधित्व मिळाले आहे. ते आमच्या कामांमुळेच पेंटिंगचा हा प्रकार अत्यंत बालिशपणाचा आहे, असा पुन्हा टोला लगावला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com