Sangli Border Issue : ...तर कर्नाटकात जाण्याशिवाय पर्याय नाही; 'पाणी' प्रश्वावरून सांगलीच्या सीमावर्ती गावांची हतबलता !

Sangli water issue Crisis : मराठीची कैवार घेणारे राज ठाकरे काय भूमिका घेणार ? गावकऱ्यांचा इशारा..
Sangli News
Sangli NewsSarkarnama

Sangli News : सांगलीच्या जत तालुक्यामधील पूर्व आणि सीमावर्ती भागातील गावांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असून, या भागासाठी महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेल्या विस्तारीत म्हैसाळ योजनेच्या कामाला देखील अद्यापही सुरुवात करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांनी शेवटचा पर्याय म्हणून कर्नाटकात जाण्याशिवाय पर्याय नाही, असे म्हणत कर्नाटक एकीकरण समिती स्थापन करण्याचा, तसेच कानडी फलक लावण्याचा इशारा महाराष्ट्र सरकारला दिला. (Latest Marathi News)

Sangli News
NCP Crisis : राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही, अजित पवार गटाने.. ; रोहित पवारांचं 'सूचक' विधान!

जत तालुक्यातील उमदी येथील पाणी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष अनिल शिंदे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून हा महाराष्ट्र सरकारला इशारा दिला आहे. तसेच महाराष्ट्र अखंड राहण्यासाठी प्रयत्न आणि आग्रही असणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता जत तालुक्यातील जनतेने घेतलेली ही भूमिका आणि दिलेल्या इशाऱ्या बाबत काय भूमिका घेणार असाही सवाल या भागातील नागरिकांनी केला आहे.

जत तालुक्यातील पाणी प्रश्न सतत धुमसत आहे. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्यावेळी कर्नाटक राज्यात जाण्याची परवानगी द्यावी, असे ठराव ग्रामसभेत करण्याचा इशारा दिला होता. यामुळे जत तालुक्यातील नागरिकांच्या या भूमिकेवरून पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील प्रलंबित सीमावादाची जुनी जखम चिघळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

Sangli News
Karnataka Border Dispute : कर्नाटकची नवी खुरापत : थेट सांगलीच्या जत तालुक्यावरच केला दावा!

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्न सुटलेलं नसताना आता कर्नाटककडून अधून-मधून महाराष्ट्रात दखल घेण्याची भूमिका घेतली जाते. मागील वर्षी कर्नाटकात भाजप सरकार असताना तेव्हाचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा सांगणार असल्याच्या विचाराबाबत कर्नाटक गांभीर्य़ाने विचार करतंय, असं वादग्रस्त विधान केले होते. यामुळे दोन्ही राज्यांच्या नेत्यांमध्ये वादावादी होऊन, सीमावर्ती भागात तणाव निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा हा प्रश्न पेटणार असल्याचे चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com