NCP Crisis : राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही, अजित पवार गटाने.. ; रोहित पवारांचं 'सूचक' विधान!

Rohit Pawar On NCP Crisis : फूट कशी पडली ते त्यांनी (अजित पवार गट) सांगावं.
Ajit Pawar Rohit pawar Sharad Pawar
Ajit Pawar Rohit pawar Sharad PawarSarkarnama

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने बंड करत पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भूमिकेपासून फारकत घेऊन वेगळी वाट चोखाळली. शिंदे--फडणवीस यांच्यासोबत जात अजित पवार गट (Ajit Pawar Group) सत्तेत सहभागी झाला. (Latest Marathi News)

सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षावर पूर्ण दावा सांगितला. पक्षनाव आणि घड्याळ चिन्हावर अजित पवारांनी दावा सांगितला आहे. हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले आहे. एकीकडे ही कायद्याची लढाई सुरू असताना शरद पवार गट समर्थक आमदार रोहित पवार यांनी यावर महत्त्वाचं विधान केले आहे.

Ajit Pawar Rohit pawar Sharad Pawar
Rohit Pawar News: भाजपविरोधी भूमिका घेतल्याने वाटलं पोलीस मला घ्यायला आले... ; रोहित पवार असं का म्हणाले?

पक्षात झालेल्या बंडावर आमदार रोहित पवार म्हणाले, “संपूर्ण पक्ष आमच्याकडेच आहे, असं आयोगाकडे सांगावं लागतं. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने याआधीच सांगितले आहे की, संपूर्ण पक्ष आमच्याकडेच आहे. कुठेही गट-तट नाही, फूट पडलेली नाही. त्यामुळे फूट कशी पडली ते त्यांनी (अजित पवार गट) सांगावं. दोन्ही गट आपली कायदेशीर भूमिका घेणार मांडणार आहे."

Ajit Pawar Rohit pawar Sharad Pawar
Satara Loksabha News : सातारा लोकसभेसाठी ठाकरे गट आग्रही; शरद पवार मतदारसंघ सोडणार का..

रोहित पवार पुढे म्हणाले, 'तसं पाहायला गेलं तर लोकभावना त्यांच्या (अजित पवार गट) विरोधात आहे, पण भाजपासाऱखी मोठी शक्ती त्यांच्यासोबत आहे. मात्र शरद पवार यांच्या बाजूला सामान्य नागरिक आहेत. लोकांची शक्ती आहे. यामुळे लोकशाहीमध्ये लोकांना विश्वासात घेऊन लढाई सुरू आहे. पुढील काळात लोकशाही जिंकणार की बलाढ्य शक्ती जिंकणार ते आपण पाहूच," असंही रोहित पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com