Nagar Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी आपल्या भाषणात 'हे सरकार सर्वसामान्यांचे आहे, गतिमान पद्धतीने आम्ही निर्णय घेतो' असे आवर्जून सांगत असतात. त्याच बरोबर 'निर्णय वेगवान, गतिमान सरकार' असेही ब्रीद सरकारने अंगीकारले आहे. एकीकडे सरकार गतिमान असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात मात्र परस्थिती वेगळी असून, हे 'गतिमान' नव्हे तर 'गतिमंद' असल्याची बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सरकारवर केली आहे. (This is a slow government: Prajakt Tanpur's criticism of Shinde-Fadnavis Govt.)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक नगर येथील पक्षाच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात पार पडली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना तनपुरे यांनी सरकारवर विविध मुद्द्यांवर तोंडसुख घेतले. राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना कोट्यवधी रुपये राज्य सरकार स्वतःच्या प्रसिद्धीसाठी खर्च करत आहे.
दुष्काळावर खर्च करण्यापेक्षा व दुष्काळ जाहीर करण्यापेक्षा स्वतःची प्रसिद्धी करण्याकरिता हे पैसे खर्च करत असतील, तर एक प्रकारे जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे, असा घणाघाती आरोप प्राजक्त तनपुरे यांनी करून हे सरकार गतिमान सरकार नसून गतिमंद सरकार आहे, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.
लोकांच्या घरामध्ये जाऊन यांनी दाखले देणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. आज अनेक योजना या प्रलंबित आहेत. अनेक योजनांचे पैसे या सरकारला देता येत नाहीत, कांद्याचे अनुदान पाच वर्षे झाले तरी मिळाले नाही, आज अवघे दहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते, त्यावेळी अनेक शेतकऱ्यांना ते मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. आमचे आघाडीचे सरकार असताना आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, या सरकारने 50 हजार रुपये शेतकऱ्यांना आम्ही देऊ, असे जाहीर केले व एक दमडीही यांनी दिली नाही, असा आरोप तनपुरे यांनी या वेळी केला.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.