
Solapur News: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रंगतदार वळणावर आली आहे. संचालक मंडळ निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनेलसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पुढाकार घेतला आहे. निवडणुकीचे चित्र बुधवारी (ता. १६) स्पष्ट झाले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काल (बुधवारी) दिवसभर वेगात राजकीय घडामोडी घडल्या. आमदार कल्याणशेट्टी, माजी आमदार माने व माजी उपसभापती हसापुरे हे शासकीय विश्रामगृहावर ठाण मांडून होते. आमदार देशमुख त्यांच्या कार्यालयात उमेदवारी निश्चितीसाठी खल -अन् धावपळ सुरू होती.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनेल व आमदार सुभाष देशमुख यांच्या श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनेलमध्ये थेट लढत होणार आहे.
माजी आमदार दिलीप माने, माजी उपसभापती सुरेश हसापुरेंसह काँग्रेसच्याच नेत्यांचे कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने जाहीर केलेल्या उमेदवार यादीत वर्चस्व आहे. तर आमदार देशमुख यांना काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी लागली आहे. कल्याणशेट्टी यांच्या असले तरी भाजपला २ जागा मिळाल्या आहेत. त्यांनी सुनील कळके, रवी रोकडे या भाजपच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे.
सर्वाधिक ५ जागा माजी आमदार माने गटाला, त्याखालोखाल ४ जागा माजी उपसभापती हसापुरे गटाला तर २ जागा शिवदारे गटाला मिळाल्या आहेत. त्यामुळे उमेदवारी यादीवर माने, हसापुरेंसह काँग्रेसच्या नेत्यांचे वर्चस्व दिसते.
माजी आमदार माने गटातून ज्येष्ठ नेते नागण्णा बनसोडे, माजी संचालक वसंत पाटील यांचे पुत्र प्रथमेश पाटील व हसापुरे गटातून सुभाष पाटोळे तिघांच्या माध्यमातून सर्वपक्षीय पॅनेलने धनगर समाजाला उमेदवारी दिली आहे.
दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र मनीष पहिल्यांदाच बाजार समितीची निवडणूक लढवत आहेत. आमदार देशमुख यांच्या पॅनेलमधून मनीष देशमुख व रामप्पा चिवडशेट्टी उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनेलमधील गणेश वानकर व संगमेश बगले यांच्यात लढत होत आहे.
सोसायटी - सर्वसाधारण दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, श्रीशैल नरोळे, प्रथमेश पाटील (भंडारकवठे ), उदयकुमार पाटील (संजवाड), नागण्णा बनसोडे (नांदणी)
सोसायटी महिला इंदुमती अलगोंड पाटील (वडकबाळ) व अनिता केदार विभूते (बोरामणी) सोसायटी-ओबीसी अविनाश मार्तंडे (मार्डी)
सोसायटी-भटक्या जाती/जमाती सुभाष पाटोळे (होटगी स्टेशन)
ग्रामपंचायत-सर्वसाधारण गणेश वानकर, संगमेश बगले (लवंगी)
ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक सुनील कळके (मुस्ती)
ग्रामपंचायत-अनुसूचित जाती/जमाती रवींद्र रोकडे (बोरामणी)
■ सोसायटी सर्वसाधारण चन्नगोंडा हविनाळे (बरुर), रमेश आसवे (अकोले मंद्रूप), भीमाशंकर बबलेश्वर (भंडारकवठे, अप्पासाहेब पाटील (वडकबाळ), बाळासाहेब पाटील (विंचूर), संग्राम पाटील (कौठाळी), धनेश अचलारे (बोरामणी) ■ सोसायटी महिला : नीलाबाई पुजारी (वडकबाळ), पुष्पा गुरव (हणमगाव ) ■ सोसायटी-ओबीसी सुभाष तेली (होनमुर्गी) ■ सोसायटी-भटक्या जाती/जमाती संदीप टेळे (औराद) ■ ग्रामपंचायत - सर्वसाधारण मनीष देशमुख, रामप्पा चिवडशेट्टी ■ ग्रामपंचायत-आर्थिक दुर्बल घटक यतीन शहा (भंडारकवठे) ■ ग्रामपंचायत-अनुसूचित जाती/जमाती अतुल गायकवाड (होटगी)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.