जयंतरावांनी भाजप नेत्याला पक्षप्रवेशासाठी पाच तास वाट बघायला लावली!

भाजपला सोलापूर शहरात धक्का बसला आहे. शहर चिटणीस बिज्जू प्रधाने यांनी सोमवारी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Jayant Patil, Bijju Pradhane
Jayant Patil, Bijju PradhaneSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : भाजपला (BJP) सोलापूर शहरात धक्का बसला आहे. शहर चिटणीस बिज्जू प्रधाने (Bijju Pradhane) यांनी सोमवारी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. पण त्यांचा प्रवेश नियोजित वेळेपेक्षा पाच तास उशिराने पार पडली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत रात्री बारा वाजता त्यांचा प्रवेश झाला.

भाजपचे बिज्जू प्राधाने यांच्या प्रवेश राष्ट्रवादीचे बळ वाढले आहे. त्यांच्यासह अन्य काही कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. आगामी सोलापूर (Solapur) महापालिका निवडणुकीच्या (Election) तोंडावर बिज्जू प्रधाने हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. मात्र, त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश मिळवण्यासाठी तब्बल पाच तास वाट पाहावी लागली आहे, त्याचीच चर्चा शहरात सुरू आहे.

Jayant Patil, Bijju Pradhane
"राजन पाटलांचं महत्व कमी होणार नाही" : जयंत पाटलांनी दिला शब्द

सोलापुरातील बाळे येथे प्रधाने यांनी पक्षात प्रवेश केला. सांगलीचे वीर जवान शाहिद रोमीत चव्हाण यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सोलापूर दौऱ्यातील सर्व कार्यक्रम उशिरा पार पडले. त्यामध्ये प्रधाने यांच्या पक्षप्रवेशाचाही समावेश होता.

दरम्यान, मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वातील पहिल्या दिवशी शेवटची सभा मोहोळ विधानसभा मतदारसंघात घेण्यात आली. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, पक्षाला ओहोटी लागली असताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाची जबाबदारी माझ्यावर दिली. आम्ही शिवस्वराज्य यात्रा काढली. तेव्हा कोणीही सभा घेत नव्हते. त्यावेळी राजन पाटील (Rajan Patil) यांनी सभा घेतली. अनेक नेते राष्ट्रवादी सोडून जात होते. तेव्हा देखील राजन पाटील आणि त्यांचे सहकारी राष्ट्रवादीसोबतच एकनिष्ठ राहिले. त्यामुळे कोणी कितीही कोल्हेकुई केली तरी राजन पाटील यांचं महत्त्व कमी होणार नाही", असा शब्द देत पाटील यांनी पक्षाचे नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांचे कौतुक केले.

जयंत पाटील पुढे म्हणाले, आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकांमध्ये ताकदीने लढा आणि चांगले यश मिळवा. या भागातील शिरापूर, आष्टी योजना २०२३ आधी पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जेवढा निधी लागेल तेवढा देण्याचे काम करू. तसेच इतरही योजना पूर्ण केल्या जातील. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अधिक सक्षम करा, असे कार्यकर्त्यांना आवाहन करताना जयंत पाटील म्हणाले. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी आमदार दिपक साळुंखे, कार्याध्यक्ष उमेश पाटील आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com