Solapur City North : भाजपला बालेकिल्ल्यात धक्का; माजी महापौरांनी राजीनामा देत पक्षाच्या आमदाराला दिले चॅलेंज

Maharashtra Assembly Election 2024 : भाजपमधील नाराजांसह काँग्रेसचा एक नेताही बनशेट्टी यांचा अर्ज भरताना उपस्थित होते, त्यामुळे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाची वाटचाल तुल्यबळ लढतीकडे सुरू झाली आहे.
Shoba Banshetti-Vijaykumar Deshmukh
Shoba Banshetti-Vijaykumar DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 24 October : भारतीय जनता पक्षाला सोलापूरमध्ये जोरदार धक्का बसला असून माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांना बनशेट्टी यांनी आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे भाजपमधील नाराजांसह काँग्रेसचा एक नेताही बनशेट्टी यांचा अर्ज भरताना उपस्थित होते, त्यामुळे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाची वाटचाल तुल्यबळ लढतीकडे सुरू झाली आहे.

सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून (Solapur City North Constituency) भाजपच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी या निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी उमेदवारीची मागणी केली होती.

याशिवाय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांंच्याकडेही त्यांनी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, भाजपने विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे, त्यामुळे शोभा बनशेट्टी (Shobha Banshetti) यांनी आज ‘गुरुपुष्यामृत’चा योग साधून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

Shoba Banshetti-Vijaykumar Deshmukh
Solapur City North : सस्पेन्स संपला; ‘सोलापूर शहर उत्तर’मध्ये रंगणार विजयकुमार देशमुख विरुद्ध महेश कोठे सामना...

माजी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अर्ज भरताना माजी सभागृह नेते सुरेश पाटील, ॲड मिलिंद थोबडे, अमर बिराजदार, बंटी बेळमकर, श्रीशैल बनशेट्टी, अशोक कटके आदी भाजप नेत्यासह काँग्रेसचे प्रवक्ते प्रा. अशोक निंबर्गी, भारत राष्ट्र समितीचे नागेश वल्याळ हेही उपस्थित होते. त्यामुळे बनशेट्टी यांच्या उमेदवारीला भाजपसह इतर पक्षातील नेत्यांचाही पाठिंबा असल्याचे स्पष्ट होत आहे.

विशेष म्हणजे सुरेश पाटील, थोबडे, श्रीशैल बनशेट्टी यांच्यासह सात माजी नगरसेवकांनी आमदार विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी देण्यास विरोध दर्शविला होता. मात्र, भाजपश्रेष्ठींनी पुन्हा एकदा देशमुख यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्याने या नाराजी एकत्र येत शोभा बनशेट्टी यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे.

Shoba Banshetti-Vijaykumar Deshmukh
Dhananjay Mahadik : 'त्या' गावात चांदीचे रस्ते अन्‌ सोन्याची कौलं असतील असं वाटलं? महाडिकांनी वर्मावर बोट ठेवले

शोभा बनशेट्टी यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठविला आहे, त्यामुळे भाजप काय माझ्यावर कारवाई करणार. मीच पक्षाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्षांकडे पाठवून दिला आहे, असे शोभा बनशेट्टी यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com