Solapur Politics: मोहिते पाटलांना धक्का; संजयमामा शिंदेंना जयवंतराव जगतापांचा पाठिंबा जाहीर

Sanjaymama Shinde and Jaywantrao Jagtap: सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं.
Solapur Politics
Solapur PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Karmala News: दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंद नलिका वितरण प्रणालीच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी पार पडले. या कार्यक्रमादरम्यान आमदार संजयमामा शिंदे यांच्या कामावर करमाळ्याचे माजी आमदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन जयवंतराव जगताप यांनी कौतुकाचा वर्षाव केला. त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं.

गेल्या काही दिवसांपूर्वी करमाळा बाजार समितीच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. या निवडणुकीमध्ये संजयमामा शिंदे यांचा गट शांततेच्या भूमिकेत राहिला. संजयमामा शिंदे यांचे प्रतिस्पर्धी असलेले अकलूजच्या मोहिते पाटलांनी आमदार शिंदेंना खिंडीत गाठण्यासाठी करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीत सहभाग घेतला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Solapur Politics
Karmala Sugarcane Issue : शिंदे-सावंतांवर शेतकऱ्यांचा भरोसा नाय का? करमाळ्यातील ऊस पवारांच्या कारखान्यांना...

करमाळा बाजार समितीची निवडणूक आमदार संजय शिंदे यांच्यापासून लांब ठेवत नारायण पाटील, रश्मी बागल व जयवंतराव जगताप या तिघांची एकत्र भेट घडवून आणत ही निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये मोहिते पाटलांना यश आलं होतं. त्यामुळे हा संजयमामा शिंदे यांना धक्का मानला जात होता.

मात्र, खरा धक्का हा माजी आमदार जयवंतराव जगतापांनी मोहिते पाटलांनाच दिल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप यांना बिनविरोध चेअरमनपदाची माळ देखील मिळाली. जगताप व आमदार शिंदे यांची युती देखील अभेद्य राहिली. गडही आला अन् सिंह देखील जवळ राहिला, तेही युद्ध न करता, म्हणावे लागेल.

मागील विधानसभेला जयवंतराव जगताप हे आमदार संजयमामा शिंदे यांच्यासोबत होते. जगताप हे मोहिते पाटलांच्या बंगल्यावरती नारायण पाटील आणि रश्मी बागल यांच्या गटासोबत दिसल्यामुळे आमदार संजयमामा शिंदे हे आगामी विधानसभेला एकाकी पडतात की काय ? असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण दहिगावच्या सिंचन योजनेच्या कामाच्या उद्घाटन समारंभामध्ये माजी आमदार जगतापांनी केलेल्या विधानामुळे करमाळ्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे.

यावेळी बोलताना माजी आमदार जगताप म्हणाले, "दहिगावच्या माध्यमातून उजनी बॅकवॉटर पेक्षाही जास्त विकास दहिगावच्या आजूबाजूच्या 24 गावांचा होईल. 2024 ला मी देखील मामांच्या पाठीशी उभा आहे. दिशाभूलला, अमिशाला बळी पडू नका. मकाई आणि आदिनाथ सारख्या संस्थेच वाटोळं कोणी केलं ? हे तालुक्याला माहिती आहे. यात माझा आणि मामांचा कसलाही संबंध नाही.

दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या शिवारात -रानात पाणी गेलं पाहिजे. शेतकरी कोट्याधीश नाही झाला तरी चालेल परंतु प्रत्येक शेतकऱ्याची चूल पेटली पाहिजे. एवढा विकास मामांच्या माध्यमातून करून घ्यायचा आहे. मामा हा कामाचा माणूस आहे. आमदार संजयमामा शिंदेंनी कधी कुणाची फसवा फसवी केली नाही. 2024 ला संजय मामांना पाठिंबा आजच मी जाहीर करतोय, तुम्ही सुद्धा निस्वार्थी मामाच्या पाठीशी उभे रहा", असे आवाहन माजी आमदार जगताप यांनी केलं.

Solapur Politics
Karad Political News : तब्बल चौदा वर्षानंतर जयंत पाटील भाजपच्या नेत्याच्या कारखान्यावर; काय आहे कारण

माजी आमदार जगताप यांच्या या विधानामुळे मोहिते पाटलांना हा मोठा धक्का मानला जात आहे. तर आमदार संजयमामा शिंदे यांचे कार्यकर्ते आता नव्या उत्साहाने पुन्हा एकदा विधानसभेच्या तयारीला लागले. आमदार संजयमामा शिंदे यांना पाठिंबा दिल्यामुळे जयवंतराव जगताप पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चेत आले आहेत.

(Edited by- Ganesh Thombare)

Solapur Politics
Laxman Hake News : मागासवर्ग आयोगाच्या कामात हस्तक्षेप वाढल्याने राजीनामा दिला; हाकेंनी सांगितले कारण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com