Solapur Lok Sabha 2024 Result : सभा घेण्यासाठी विरोध झालेल्या गावातच प्रणिती शिंदेंना मिळालं मताधिक्य!

Praniti Shinde : लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रणिती शिंदे यांनी संभाव्य काँग्रेसच्या उमेदवार म्हणून गाव भेट दौऱ्याचे आयोजन केले होते.
Praniti Shinde
Praniti ShindeSarkarnama

Praniti Shinde Lead News : लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी गावभेट दौऱ्यात मराठा आरक्षण प्रश्नावरून आमदार प्रणिती शिंदे यांना सभा घेण्यास मज्जाव करणाऱ्या पाठखळ गावातून 307 मतांचे मताधिक्य मिळाले. तालुक्यात 11 गावे वगळता सर्वच गावातून प्रणिती शिंदे या आघाडीवर राहिल्या.

लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रणिती शिंदे यांनी संभाव्य काँग्रेसच्या उमेदवार म्हणून गाव भेट दौऱ्याचे आयोजन केले, त्यामध्ये पहिल्याच दौऱ्यात पहिल्याच गावात पाटकळ येथे त्यांना मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट नसल्यामुळे आम्ही नेत्याला गावबंदी केली असल्याचे सांगत त्यांना सभा घेण्यास मज्जाव केला त्यानंतर त्यांनी सभा न घेता ग्रामस्थ संवाद करून पुढच्या दौऱ्याला मार्गस्थ झाल्या एकूणच त्यांच्या मंगळवेढा दौऱ्यात फक्त पाटकळ येथे त्यांना विरोधात सामोरे जावे लागले.

Praniti Shinde
MNS-NCP Bet : सोलापुरातील विजयाची मनसे पदाधिकारी हरला पैज; शरद पवार गटाला दिला लाखाचा धनादेश

मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाटकळ गावाने प्रणित शिंदे (Praniti Shinde) यांना 307 मताचे मताधिक्य मिळत चार बुथवर 1178 इतकी मते तर भाजपचे राम सातपुते यांना 871 इतकी मते मिळाली. लोकसभा निवडणूक या दौऱ्या दरम्यान त्यांनी पाणी प्रश्नावरून रान उठवले तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न देखील उपस्थित केला होता.

आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नाने मंत्रिमंडळाची मान्यता दिलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या 24 गावात देखील भाजपच्या उमेदवाराला अपेक्षित मताधिक्य मिळालेले नाही. लेंडवे चिंचाळे, खुपसंगी, हाजापूर, जालीहाळ, भाळवणी, नंदेश्वर, भोसे, शिरसी, गोणेवाडी, रड्डे, निंबोणी, येड्राव खवे, जित्ती, आंधळगाव, लक्ष्मीदहिवडी पाठखळ, खडकी, सिध्दनकेरी, जुनोनी, या गावात देखील या योजनेच्या मंजुरीचा फायदा भाजप उमेदवाराला झाला नाही.

Praniti Shinde
Komal Dhoble-Praniti Shinde : भाजपकडून इच्छूक असलेल्या ढोबळेंच्या कन्येने केले प्रणिती शिंदेंचे कौतुक

एकमेव प्रदीप खांडेकर यांच्या गावात भाजपचा उमेदवार आघाडीवर राहिला. ज्या पद्धतीने ही योजना मंजूर झाल्याचे भाजपच्या नेत्याकडून सांगण्यात येत होते मात्र या योजनेसाठी आवश्यक असणारा बॅरेजेस वगळून या योजना चुकीच्या पद्धतीने मंजुरी दिली गेली असा प्रचार या निवडणुकीदरम्यान करण्यात आला.

राजकीय व्यासपीठावर अनेक वर्ष तरंगत राहिलेला या योजनेबद्दल लोकांची विश्वासार्हता निर्माण करण्यात सत्ताधारी पक्ष देखील कमी पडला, उलट विरोध पक्षे त्याचे योग्य भांडवल करत त्याचे रूपांतर मतात करण्यात यशस्वी ठरला

जिथं पाणी साठवू शकत नाही तेच पाणी शेतीला कसे पुरवणार? मूळ अंदाजपत्रक असलेला बॅरेज नव्या नव्याने मंजुरी देताना त्यामध्ये समावेश केला नाही. त्यामुळे या योजनेतून या भागातील जनतेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला गेला.

म्हणून शासनाने पाणी साठवण्यासाठी बॅरेजचा समावेश करणे आवश्यक आहे, अन्यथा त्याचे परिणाम विधानसभेला देखील होऊ शकतात. अशी प्रतिक्रिया पाणी चळवळीतील आंदोलक पांडुरंग चौगुले यांनी दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com